नोएडा, 07 एप्रिल : कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 75 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या लढाईसाठी अनेक दिग्गजांनी सरकारला मदत केली आहे. खेळाडूंनीही यासाठी मदत केली आहे. आता यामध्ये युवा गोल्फपटू अर्जुन भाटी यानेही मदतीचा हात पुढे केला आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर अनेक संस्था, उद्योगपती, क्रीडा विश्वातून मदतीचा ओघ सुरू झाला. नोएडात राहणाऱ्या अर्जुननेही त्याच्या ट्रॉफी आणि कमाई 102 लोकांना दिली आहे.
आपको🙏 8 साल में जो देश,विदेश से जीतकर कमाई हुई 102 ट्रोफ़ी देश संकट के समय मैंने 102 लोगों को दे दी,उनसे आए हुए कुल-4,30,000-Rs आज PM Care Fund में देश की मदद को दिए,ये सुनकर दादी रोई फिर बोली तू सच में अर्जुन है,आज देश के लोग बचने चाहिए ट्रोफ़ी तो🏆फिर आ जाएँगी,@narendramodi 🇮🇳 pic.twitter.com/wmoJtyObzi
अर्जुनने ट्विट करताना म्हटलं की, देश-विदेशात जिंकलेल्या ट्रॉफी या संकटकाळात मी 102 लोकांना दिल्या आहेत. त्यातून मिळालेले एकूण 4 लाख 30 हजार रुपये पीएम केअर्स फंडात मदत म्हणून दिले. हे ऐकून आजी रडली आणि म्हणाली तु खरंच अर्जुन आहे. आज देशातील लोक वाचले पाहिजेत, ट्रॉफी तर पुन्हाही मिळवशील.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात मोठ्या संख्येनं लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना व्हायरस वेगानं वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या हजारांवर पोहोचली आहे. याआधी अर्जुनच्या आजीने तिची एक वर्षांची पेन्शन दान करण्याचा निर्णय घेतला होता. अर्जुनने या संदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली. अर्जुनचे आजोबा सैन्यात होते त्यांच्या नंतर 2005 पासून अर्जुनच्या आजीला पेन्शन मिळत आहे.
15 वर्षांच्या अर्जुननं आतापर्यंत 150 गोल्फ टूर्नामेंट खेळल्या आहेत. कॅलिफोर्नियामध्ये झालेली ज्युनियर वर्ल्ड गोल्फ चॅम्पियनशिपचा अर्जुन विजेतासुद्धा झाला होता. याआधी त्यानं 2016 साली अंडर- 12 आणि 2018 रोजी अंडर 14 वयोगटातून गोल्फ वर्ल़्ड चॅम्पियनशिप मिळवली आहे.