जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कोरोनाच्या लढ्यात पाकला अशी घ्यावी लागली जसप्रीत बुमराहची मदत

कोरोनाच्या लढ्यात पाकला अशी घ्यावी लागली जसप्रीत बुमराहची मदत

सेमीफायनलमध्ये भारताच्या गोलंदाजीची धुरा ही वेगवान गोलंदाज जस्रपीत बुमराह याच्या खांद्यावर असणार आहे. बुमराहनं वर्ल्ड कपमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत.

सेमीफायनलमध्ये भारताच्या गोलंदाजीची धुरा ही वेगवान गोलंदाज जस्रपीत बुमराह याच्या खांद्यावर असणार आहे. बुमराहनं वर्ल्ड कपमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत.

पाकमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पाकमध्ये 3,505 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

इस्लामाबाद, 07 एप्रिल : कोरोनाव्हायरसने जगभरात 70 हजारहून अधिकांचा जीव घेतला आहे. भारताही 100हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्येही परिस्थिती वाईट आहे. पाकमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पाकमध्ये 3,505 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 51 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकमध्येही लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी पाकने भारतीय जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहची मदत घेतली आहे. बुमराहच्या नो-बॉलचा वापर करत पाकिस्तानने लोकांना आवाहन केले आहे. हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुमराहचा फोटो वापरून केले अपील पाकिस्तान सुपर लीगमध्ये एक संघ इस्लामाबाद युनायटेड यांनी लोकांना घरा राहण्याते आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी बुमराहचा एक फोटो ट्वीट केला आहे. इस्लामाबाद संघाने पाकिस्तानविरुद्ध बुमराहनं टाकलेल्या नो-बॉलचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला लाईन क्रॉस केली नका करू, महागात पडेल, असे कॅप्शन दिले आहे. वाचा-  कोरोनाच्या संकटात पाकच्या अडचणी वाढल्या, डॉक्टरांनी बहिष्कार टाकत काम केलं बंद

जाहिरात

वाचा- तबलिगींमुळे पाकमध्ये परिस्थिती बिघडली, वाचा कसा माजलाय हाहाकार महागात पडला होता तो नो-बॉल इस्लामाबाद युनायटेडने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यानचा हा फोटो टाकला आहे. बुमराहने पाकिस्तानी सलामीवीर फखर जमानला बाद केले, परंतु ती नो-बॉल होता. जमानने या जीवनदानाचा फायदा घेत शतकी खेळी करत भारताला हरवले होते. इस्लामाबाद युनायटेडने​2 एप्रिलला हे ट्वीट केल्यानंतर भारतीय चाहत्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. वाचा- कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अखेर इमरान यांना घ्यावी लागली मोदी सरकारची मदत पाकमध्ये डॉक्टरांनी केले कामबंद आंदोलन कोरोना व्हायरसच्या संसर्गाविरोधात लढणाऱ्या डॉक्टरांवर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये लाठीचार्ज करण्यात आला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सेफ्टी किट सर्व डॉक्टरांना देण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी युवा डॉक्टर आणि पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांनी क्वेटामध्ये आंदोलन केले. मात्र, या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जच्या निषेधार्थ ‘यंग डॉक्टर्स असोसिएशन’ने रुग्णालयातील सेवेवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात