Home /News /sport /

EXCLUSIVE : चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी, IPLचे आयोजन होणार; BCCIने तयार केला प्लॅन

EXCLUSIVE : चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी, IPLचे आयोजन होणार; BCCIने तयार केला प्लॅन

जयपूरमध्ये झालेल्या लिलावात अनेख खेळाडूंना परत संघात घेतले. युवराज सिंगला खरेदी करून मुंबईने सर्वांनाच धक्का दिला आहे. याशिवाय मलिंगाला संघात घेण्यामध्ये मुंबई यशस्वी ठरले. यांच्याशिवाय अनमोलप्रीत सिंग आणि बरिंदर सरन यांना 3.4 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले. तर राशिक डार आणि पंकज जयस्वाल यांनाही लिलावात घेतले आहे.

जयपूरमध्ये झालेल्या लिलावात अनेख खेळाडूंना परत संघात घेतले. युवराज सिंगला खरेदी करून मुंबईने सर्वांनाच धक्का दिला आहे. याशिवाय मलिंगाला संघात घेण्यामध्ये मुंबई यशस्वी ठरले. यांच्याशिवाय अनमोलप्रीत सिंग आणि बरिंदर सरन यांना 3.4 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले. तर राशिक डार आणि पंकज जयस्वाल यांनाही लिलावात घेतले आहे.

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल कोरोनामुळे रद्द होण्याच्या मार्गावर असताना चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

    नवी दिल्ली, 10 एप्रिल : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल कोरोनामुळे रद्द होण्याच्या मार्गावर असताना चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 29 मार्चला सुरू होणारी ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता ही स्पर्धा जुलैमध्ये आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या वतीने लॉकडाऊननंतर याबाबत बैठक घेणार आहे. सीएनबीसी टीव्ही-18ला बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै अखेरीस रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन केले जाऊ शकते. यासाठी बीसीसीआयच्या वतीने तारखा शोधण्याचे काम सुरू आहे. यानुसार जुलै किंवा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित केला जाऊ शकतो. दरम्यान, जर आयपीएल रद्द करण्यात आली तर बीसीसीआयला 7 हजार कोटी ते 47 हजार कोटींचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआय आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. वाचा-या 5 दिग्गज खेळाडूंच्या करिअरवर Coronavirus चे संकट, घ्यावी लागणार निवृत्ती! बीसीसीआयचे प्लॅनिंग सुरू कोरोनाचा प्रसार आणि लॉकडाऊनचा कालावधी यांवर बीसीसीआयची योजना असेल. आयपीएल आयोजक संघ सर्व शक्यतांचा विचार करत आहे. या पर्यायांमध्ये परदेशी खेळाडूविनाही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी आहे. तसेच, चाहत्यांशिवाय ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल. आयपीएल हा बीसीसीआयचा महसूल मिळवण्याचा एक मोठा मार्ग आहे, त्यामुळे ही स्पर्धा रद्द झाल्यास त्याचा सगळ्यात जास्त फटका बीसीसीआयला बसेल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेऊ. आम्ही ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान तारखा बघत आहोत, असे सांगितले. वाचा-VIDEO : कोण पंत? ऋषभने रोहितला दिलेल्या सिक्सर चॅलेंजवर भडकला हिटमॅन आशिया कपच्या वेळापत्रकात होणार बदल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आशिया चषक परिषदेचे आशिया चषक वेळापत्रक बदलण्यासाठी पटवून देऊ शकते. तरी, आयपीएलसाठी बीसीसीआयकडे 37 दिवसांचा कालावधी असेल. या काळात त्यांना सर्व सामने खेळवावे लागतील. तसेच, पावसाळ्यामुळे काही सामन्यांना फटकाही बसू शकतो. वाचा-'डेब्यूआधी रोहित खूप आळशी वाटायचा पण...', युवीने हिटमॅनबाबत केला मोठा खुलासा ऑगस्ट-ऑक्टोबर दरम्यान महत्त्वाच्या स्पर्धा सध्याच्या वेळापत्रकानुसार भारतीय संघाला सप्टेंबरमध्ये आशिया चषक खेळायचा आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी -२० सामन्यांची मालिका आहे. यानंतर ऑस्ट्रेलियात टी २० वर्ल्ड कप होणार आहे. भारतीय संघाचा तीन एकदिवसीय सामन्यांसाठी झिम्बाब्वे दौर्‍याचे वेळापत्रकदेखील नियोजित आहे. इतर संघांबाबत बोलायचे झाल्यास इंग्लंडचा संघ पाकिस्ताविरुद्ध मालिका खेळणार आहे. हा दौरा 2 सप्टेंबर रोजी संपेल. यानंतर आयर्लंडचा संघ इंग्लंडमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत खेळेल. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा ऑगस्टमध्ये मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ या दोन महिन्यांत कोणतीही मालिका खेळणार नाही. संकलन, संपादन-प्रियांका गावडे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या