तिरुअनंतरपुरम, 07 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. देशात 4 हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. तर अनेक शहरांमध्ये कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. मात्र अजुनही लोकांना त्याचं गांभीर्य दिसत नाही. सोशल डिस्टंसिंगचं पालन न करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्यांवर आता सरकारकडून कठोर कारवाईसाठी पावलं उचलली जाणार आहेत. अशा लोकांवर ड्रोनची नजर असणार आहे. सीसीटीव्हीसोबतच आता राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये ड्रोन फिरून नागरिकांवर नजर ठेवणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्या नागरिकाजवळ हा ड्रोन पोहोचतो आणि जोरात सायरन वाजायला सुरुवात होईल. या व्हिडिओला क्रिकेटची कॉमेंट्री जोडली आहे. हा प्रकार पाहून तिथला नियम मोडणारा नागरिक पळत सुटल्याचं दिसतं. केरळ पोलिसांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. महाराष्ट्रानंतर केरळ आणि तेलंगणातसुद्धा कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी केरळ पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांसाठी हा ड्रोन तयार केला आहे. हा ड्रोन गर्दीच्या ठिकाणी किंवा नियम मोडणाऱ्या नागरिकाचा पाठलाग करतो आणि त्याच्याजवळ गेल्यावर जोरात सायरन वाजायला सुरुवात होते. आवाज ऐकून लोक पळून जातात. आपण पोलिसांना दिसू नये यासाठी अनेक नियम मोडणारे लोक आपला चेहरा लपवून जात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ नीट पाहा त्यामध्ये हा ड्रोन कसा काम करणार आहे हे पोलिसांनी सांगितलं आहे.
केरळ पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर करताना दिग्गज क्रिकेटर कपिल देव, रवी शास्त्री आणि आकाश चोपडा यांच्या आवाजात कॉमेंट्री बॅकग्राऊंडला जोडली आहे. त्यामुळे या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. रवी शास्त्री यामध्ये ‘ट्रेस ऑफ बुलेट’ टर्म समजावून सांगत आहेत. ह्या व्हिडीओला आतापर्यंत 3 हजार 200 लोकांनी लाईक केलं आहे. तर एक हजारहून अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. 1.23 मिनिटांचा हा व्हिडीओ केरळ पोलिसांनी आपल्यां अकाऊंटवर शेअर केला आहे. हे वाचा : गोल्फपटू नातवाने कोरोनाशी लढ्यात केलेल्या मदतीनंतर आजी रडली; म्हणाली… संपादन - सुरज यादव