जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / FIFA : सेमीफायनलचे ४ संघ ठरले, दोन मित्र एकमेकांशी भिडणार

FIFA : सेमीफायनलचे ४ संघ ठरले, दोन मित्र एकमेकांशी भिडणार

FIFA : सेमीफायनलचे ४ संघ ठरले, दोन मित्र एकमेकांशी भिडणार

फिफा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलची लाइन अप निश्चित झाली आहे. क्रोएशिया, अर्जेंटिना, मोराक्को आणि फ्रान्सने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 डिसेंबर : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये चार संघांची नावे निश्चित झाली आहेत. यातील एका लढतीत फुटबॉल चाहत्यांना दोन मित्र आमने सामने लढताना दिसणार आहेत. ब्राझीलला बाहेरचा रस्ता दाखवणारा क्रोएशिया अर्जेंटिनाविरुद्ध काय कमाल करणार हे पाहावं लागेल. चारही संघ आता फिफा वर्ल्ड कपपासून फक्त दोन पावलं दूर आहेत. फिफा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलची लाइन अप निश्चित झाली आहे. क्रोएशिया, अर्जेंटिना, मोराक्को आणि फ्रान्सने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. यामध्ये मोराक्को हा पहिलाच आफ्रिकी देश आहे ज्याने पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. मोराक्कोने अशी कामगिरी करत इतिहास घडवलाय. हेही वाचा :  VIDEO : इंग्लंडच्या कॅप्टनने केली मोठी चूक, एम्बाप्पेला आवरलं नाही हसू

 सेमीफायनलचे दोन सामने वेगवेगळ्या दिवशी होणार आहेत. यात पहिल्या सामन्यात क्रोएशिया आणि अर्जेंटिना आमने-सामने येतील. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने क्वार्टर फायनलमध्ये नेदरलँडला हरवलं. तर क्रोएशियाने ब्राझीलला पेनल्टी शुटआऊटवर बाहेरचा रस्ता दाखवत वर्ल्ड कपमध्ये मोठी उलथापालथ केली.

हेही वाचा :  अनुष्काला कधी प्रपोज केलं नाही, विराटने स्वत: सांगितलं होतं कारण

फिफा वर्ल्ड कपमध्ये दुसरी सेमीफायनल मोराक्को आणि फ्रान्स यांच्यात होणार आहे. हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरतील तेव्हा दोन मित्रही आमने-सामने असतील. मोराक्कोचा अशरफ हकीमी आणि फ्रान्सचा एम्बाप्पे हे दोघेही आपआपल्या संघाचे स्टार फुटबॉलपटू आहेत. याशिवाय दोघेही एकमेकांचे चांगले मित्रही आहेत. फ्रान्सचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचताच हकिमीने ट्विटरवर एम्बाप्पेला मित्रा लवकरच भेटू असं म्हटलं आहे. फ्रान्सने शेवटच्या क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंडला २-१ ने हरवलं. तर मोराक्कोने पोर्तुगालवर विजय मिळून पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये धढक मारली आहे. आता मोराक्को फ्रान्सविरुद्ध कसं खेळते याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात