मुंबई, 11 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये गतविजेत्या फ्रान्सने इंग्लंडचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला. सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने पहिल्या पेनल्टीवर गोल केला. मात्र दुसऱ्या पेनल्टीवर गोल करण्यात त्याला अपयश आले. यावेळी फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू कायलिन एम्बाप्पेला हसू आवरलं नाही. हॅरी केन याच्या या चुकीची किंमत इंग्लंडला वर्ल्ड कपमधून बाहेर पडून मोजावी लागली असली तरी संघातील सहकाऱ्यांनी आम्ही हॅरी केनसोबतच आहोत असं म्हटलंय. फ्रान्सने सामन्यात 2-1 ने आघाडी घेतली असताना 84 व्या मिनिटाला इंग्लंडला बरोबरीची संधी मिळाली होती. पण पेनल्टीवर केनने मारलेला शॉट क्रॉसबारच्या वरून गेला आणि इंग्लंडच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या. फ्रान्सने क्वार्टर फायनलमध्ये जिंकून आता सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये त्यांचा सामना मोराक्कोशी होणार आहे. हेही वाचा : पदार्पणानंतर 12 वर्षांनी टीम इंडियात खेळणार गोलंदाज, BCCIने दिली संधी फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू कायलिन एम्बाप्पेने केनच्या या चुकीनंतर जोरदार सेलिब्रेशन केलं. एम्बाप्पेला यावेळी हसू आवरता आलं नाही. तर दुसऱ्या बाजूला केनसह इंग्लंडचे खेळाडु आणि चाहत्यांनासुद्धा धक्का बसला होता. केनला विश्वास बसत नव्हता की इतकी मोठी चूक आपण केलीय. जर्सीने आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न त्याने केला.
Mbappe laughs after Harry Kane missed a penalty 🤣
— 🆉🅸🆉🅾🆄 (@zi_46) December 10, 2022
https://t.co/BurhjRSM3z
इंग्लंडच्या संघातील केनच्या सहकाऱ्यांनी मात्र यामुळे दु:खी होण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. हॅरी केनमुळेच इंग्लंडचा संघ इथपर्यंत पोहोचला असल्याच्या भावना खेळाडुंनी व्यक्त केल्या. हॅरी केनने सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये पाच सामन्यात दोन गोल केले. फ्रान्सविरुद्ध त्याचा गोल हा इंग्लंडकडून केलेला 53वा गोल होता. यासह त्याने वायने रुनीनच्या राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली. हेही वाचा : कतारमध्ये अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू, रेनबो शर्टमुळे पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात
इंग्लंडचा मीडफिल्डर जॉर्डन हँडरसनने म्हटलं की, “आम्हाला माहितीय की हॅरीने पेनल्टीवर आमच्यासाठी किती गोल केले आहेत. त्या सामन्यातही पेनल्टीवर गोल मारला होता. आम्ही इथपर्यंत पोहोचण्यात त्याचं महत्त्वाचं योगदान आहे. तो जागतिक स्तरावरचा स्ट्रायकर आहे. आमचा कर्णधार आहे आणि तो नसता तर आम्ही इथपर्यंतही पोहोचू शकलो नसतो.”