जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अनुष्काला कधी प्रपोज केलं नाही, विराटने स्वत: सांगितलं होतं कारण

अनुष्काला कधी प्रपोज केलं नाही, विराटने स्वत: सांगितलं होतं कारण

अनुष्काला कधी प्रपोज केलं नाही, विराटने स्वत: सांगितलं होतं कारण

कोहलीने असाही खुलासा केला होता की जर लग्नाच्या नियोजनाची जबाबदारी त्याच्यावर असती तर तीन दिवसाच्या आतच लग्न कुठे, कधी याची माहिती इतरांना समजली असती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 डिसेंबर : भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. त्यानंतर भारतात दोघांनी दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शन पार्टी दिली होती. विराट कोहलीने एका शोमध्ये बोलताना सांगितलं होतं की, त्याने कधीच अनुष्काला प्रपोज केलं नाही कारण दोघांनाही आपण एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनलोय असं वाटत होतं. दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीसोबत बोलताना कोहलीने सांगितलं होतं की, मी कधी अनुष्काला प्रपोज केलं नाही. जेव्हा नकळत प्रेमात पडता तेव्हा प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाइन डेसारखा असू शकतो आणि खास असू शकतो. आम्हाला कधी वाटलंच नाही की आम्हाला प्रपोज करण्याची गरज आहे. आम्हाला माहिती होतं की आम्ही एकमेकांशी लग्न करणार आहे आणि याबाबत आमच्यात कसलीच शंका नव्हती. हेही वाचा :  अनुष्का शर्मा विराट कोहलीपेक्षा वयाने मोठी; पाहा किती आहे फरक कोहलीने असाही खुलासा केला होता की जर लग्नाच्या नियोजनाची जबाबदारी त्याच्यावर असती तर तीन दिवसाच्या आतच लग्न कुठे, कधी याची माहिती इतरांना समजली असती. आम्ही आमच्या लग्नासाठी खरेदी करताना वेगवेगळ्या नावाचा आणि ईमेल आयडीचा वापर केला. हा प्लॅन माझा नव्हता, जर माझ्याकडे ही जबाबदारी असती तर नक्कीच भांडं फुटलं असतं. मी सगळंच सांगून टाकलं असतं, जेवणापासून सजावटीपर्यंत. एक गोष्ट चांगली होती की मी तेव्हा कसोटी खेळत होतो आणि त्यामुळे सगळं गुपित राहिलं. हेही वाचा :  VIDEO : इंग्लंडच्या कॅप्टनने केली मोठी चूक, एम्बाप्पेला आवरलं नाही हसू

 विराट अनुष्का यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली असून दोन वर्षांपूर्वी त्यांना एक मुलगी झालीय. दोघांनीही त्यांच्या मुलीला प्रसिद्धीपासून दूर ठेवलं आहे. तसंच लोकांनाही याबाबत आवाहन केलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात