फीफा वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा वयाच्या 19 व्या वर्षी खेळताना फ्रान्सचा फुटबॉलपटू किलीयन एम्बाप्पेने त्याच्या पहिल्याच स्पर्धेत चार गोल केले होते. त्यानंतर आताही त्याचा दबदबा दिसून येत आहे. पोलंडविरुद्धच्या सामन्यात एम्बाप्पेने दोन गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. फ्रान्सने या गोल्सच्या जोरावर पोलंडला 3-1 अशा गोल फरकाने पराभूत केलं.
फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू असणाऱ्या एम्बाप्पेने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 5 गोल केले आहेत. तो गोल्डन बूटच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. तर आतापर्यंत दोन वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये त्याने 9 गोल केले आहेत. त्याने 11 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.
हेही वाचा : भारताकडून अशा चुका अपेक्षित नव्हत्या, वासिम जाफरने सांगितली पराभवाची 3 कारणे
एम्बाप्पेने वर्ल्ड कपमध्ये गोलच्या बाबतीत मेस्सीसोबत बरोबरी केली आहे. मेस्सीपेक्षा कमी सामन्यात एम्बाप्पेने 9 गोल केले आहेत. मेस्सीने 23 सामन्यात 9 गोल केले होते. तर रोनाल्डोने 21 सामन्यात 8 गोल नोंदवले आहेत. ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले यांनीही वर्ल्ड कपमध्ये 8 गोल नोंदवले आहेत.
फ्रान्सने 2018 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हा एम्बाप्पेने चार गोल नोंदवले होते. 19 वर्षे वय असताना त्याने अंतिम सामन्यात गोल केल्यावर पेले यांच्यानंतर कमी वयात अंतिम सामन्यात गोल करणारा दुसरा युवा खेळाडु ठरला होता. पेले यांच्या नावावर 17 व्या वर्षी कमी वयात अंतिम सामन्यात गोल करण्याचा विक्रम आहे. 1958 मध्ये स्वीडनविरुद्ध त्यांनी ही कामगिरी केली होती तर एम्बाप्पेने क्रोएशियाविरुद्ध गोल केला होता.
हेही वाचा : खराब फलंदाजी, 30-40 धावा कमी, प्रेशर.. पराभवावर रोहित पहिल्यांदाच उघडपणे बोलला
पॅरिसमध्ये जन्मलेल्या एम्बाप्पेने 14 व्या वर्षीच मोनाको क्लबच्या ओकडून खळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर एम्बाप्पेने कधीच मागे वळून पाहिले नाही. एम्बाप्पेची आई हँडबॉलपटू तर वडील फुटबॉलपटू आहेत. जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये एम्बाप्पेचं नाव घेतलं जातं. त्याने 2019 मध्ये 23.61 किमी प्रति तास वेगाने धावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तसंच सध्या कमाईच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूंमध्येही एम्बाप्पेचा समावेश होतो. तो 9 अब्ज रुपये ऑनफिल्ड कमावतो, तर जाहिरातीमधून त्याचे उत्पन्न 2 अब्ज इतके आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: FIFA, FIFA World Cup, Football, France