मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Football: मेसी-रोनाल्डोनंतर 'कॅप्टन फॅन्टास्टिक', फिफाकडून या भारतीय फुटबॉलरची कहाणी जगासमोर

Football: मेसी-रोनाल्डोनंतर 'कॅप्टन फॅन्टास्टिक', फिफाकडून या भारतीय फुटबॉलरची कहाणी जगासमोर

सुनील छेत्री

सुनील छेत्री

Football: 'तुम्हाला रोनाल्डोची कहाणी माहित असेल, मेसीची कहाणी माहित असेल पण आता तुम्हाला तिसऱ्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या खेळाडूची कहाणी माहित होईल.'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 28 सप्टेंबर: भारतात फुटबॉलची क्रेझ क्रिकेटएवढी नाही. फुटबॉल हा खेळ देशातल्या ठराविक राज्यात खेळला जातो. पण भारतीय फुटबॉल संघ गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यानं चागंली कामगिरी बजावताना दिसतोय. आणि त्या कामगिरीमागचा नायक आहे भारतीय फुटबॉल संघाचा कॅप्टन सुनील छेत्री. सुनील छेत्री हा नक्कीच भारतीय फुटबॉलमधला आजवरच्या महान फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे.  भारतीय कर्णधाराच्या खात्यात आजवर अनेक विक्रमांची नोंद आहे. इतकच नव्हे तर सध्याच्या फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंपैकी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत सुनील छेत्री हे नाव पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाच्या लायनल मेसीनंतर घेतलं जातं. याचाच गौरव म्हणून फिफानं 38 वर्षांच्या सुनील छेत्रीच्या आयुष्यावर एक छोटी सीरीज प्रदर्शित केली आहे.

'कॅप्टन फॅन्टास्टिक'

फिफाच्या या नव्या सीरीजचं नाव आहे 'कॅप्टन फॅन्टास्टिक'. ही सीरीज फिफा प्लस या फिफाच्या ऑफिशियल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. फिफानं यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक पोस्टही केली आहे. ज्यात मेसी आणि रोनाल्डोसह सुनील छेत्री एका पोडियमवर उभे असल्याचं दाखवलं आहे. सर्वाधिक गोल नावावर असलेला रोनाल्डो पहिल्या, मेसी दुसऱ्या तर छेत्री तिसऱ्या नंबरवर या पोडियमवर दिसत आहे. त्याखाली फिफानं कॅप्शन दिलंय... 'तुम्हाला रोनाल्डोची कहाणी माहित असेल, मेसीची कहाणी माहित असेल पण आता तुम्हाला तिसऱ्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या खेळाडूची कहाणी माहित होईल.'

रोनाल्डो-मेसीनंतर छेत्रीचा नंबर

छेत्रीच्या गोल स्कोरींग कौशल्यामुळे सध्या त्याचं नाव रोनाल्डो आणि मेसीसोबत घेतलं जात आहे. 38 वर्षीय छेत्री सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत एकूण पाचव्या स्थानावर आहे. तर सध्या खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये तो तिसरा आहे. रोनाल्डोच्या खात्यात सर्वाधिक 117 गोल आहेत. तर मेसीनं 90 गोल केले आहेत. छेत्रीच्या खात्यात आतापर्यंत 84 गोल जमा आहेत.

हेही वाचा - ICC T20 Rankings: टीम इंडियाचा ‘सूर्य’ पुन्हा चमकला... टी20 रॅन्किंगमध्ये भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंचा बोलबाला

फिफाच्या या सीरीजमधली काही दृश्य बंगळुरुत शूट करण्यात आली आहेत जिथे छेत्रीचं सध्या वास्तव्य आहे. तसच त्याचे आई-वडिल राहत असलेल्या दिल्लीतही काही सीन शूट करण्यात आले आहेत. सीरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये छेत्री भारताचा कॅप्टन बनल्यानंतरच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

विराटकडून अभिनंदन

दरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीनं सुनील छेत्रीला फिफानं दिलेल्या सन्मानाबद्दल सोशल मीडियातून अभिनंदन केलं

First published:

Tags: FIFA World Cup, Football, Sports