तिरुअनंतपुरम, 28 सप्टेंबर**:** आयसीसीच्या टी20 खेळाडूंची ताजी क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यात भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना चांगलाच फायदा झाला आहे. पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज मोहम्मद रिझवाननं इंग्लंडविरुद्धच्या सात टी20 सामन्यांच्या सुरु असलेल्या मालिकेत शानदार प्रदर्शन केलं. त्यामुळे टी20 बॅट्समनच्या यादीत रिझवान पहिल्या नंबरवर पोहोचला आहे. तर टीम इंडियाचा आघाडीचा बॅट्समन सूर्यकुमार यादवनं पुन्हा एकदा नंबर दोनवर आपला हक्क सांगितला आहे. कांगारुंविरुद्ध तळपली सूर्याची बॅट आशिया कपननंतर भारताच्या सूर्यकुमार यादवनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही दमदार परफॉर्मन्स दिला. त्यानं पहिल्या टी20त 46 आणि तिसऱ्या टी20त 69 रन्स फटकावले. भारताला ही मालिका 2-1 अशी जिंकून देण्यात सूर्यकुमार यादवची भूमिका महत्वाची ठरली. त्याचबरोबर आयसीसीच्या रँकिंगमध्येही सूर्याला याचा फायदा झाला. सूर्यकुमार सध्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवाननंतर आयसीसी टी20 बॅट्समनच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेही वाचा - Ind vs SA: वर्ल्ड कपआधी शेवटची परीक्षा… दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग XI? बाबर आझम तिसऱ्या स्थानी आशिया कपपर्यंत पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम टी20त अव्वल स्थानावर कायम होता. पण आशिया कपमध्ये त्याला प्रभाव पाडता आला नाही. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यातही बाबरची बॅट चालली नाही. त्यामुळे रँकिंगमध्ये त्याचं स्थान घसरलं. पण इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20त मात्र बाबर आझमनं खणखणीत शतक ठोकलं. या खेळीनं त्याला थेट तिसऱ्या नंबरवर आणून सोडलं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माचं स्थान एका अंकानं सुधारलं आहे. तो सध्या 13 व्या स्थानावर आहे. तर बॉलिंगमध्ये अक्षर पटेलनं थेट 15 अंकांनी झेप घेतली आहे. अक्षर पटेल 33 वरुन थेट 18व्या नंबरवर पोहोचला आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात प्रत्येकी तीन आणि नागपूरच्या दुसऱ्या टी20 सामन्यात दोन विकेट्स अशा मालिकेत एकूण आठ विकेट्स घेतल्या होत्या.
India and Pakistan stars among the big movers in the latest @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings 🇮🇳 🇵🇰
— ICC (@ICC) September 28, 2022
Full story 👇
हार्दिक चौथ्या स्थानी टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पंड्याच्या रँकिंगमध्येही एका अंकानं सुधार झाला आहे. तो सध्या ऑल राऊंडर खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.