जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सेमीफायनलमध्ये मेस्सीच्या खेळण्यावर येऊ शकते बंदी, फिफा कारवाईच्या तयारीत

सेमीफायनलमध्ये मेस्सीच्या खेळण्यावर येऊ शकते बंदी, फिफा कारवाईच्या तयारीत

सेमीफायनलमध्ये मेस्सीच्या खेळण्यावर येऊ शकते बंदी, फिफा कारवाईच्या तयारीत

मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत अनेक यशाची शिखरे गाठली. पण गेल्या दोन दशकांच्या फूटबॉल कारकिर्दीत त्याला अर्जेंटिनासाठी फिफा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 डिसेंबर : जगातल्या दिग्गज फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लियोनेल मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत अनेक यशाची शिखरे गाठली. पण गेल्या दोन दशकांच्या फूटबॉल कारकिर्दीत त्याला अर्जेंटिनासाठी फिफा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. यंदा त्याला वर्ल्ड कप विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे. अर्जेंटिनाने नेदरलँडला हरवून सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. मात्र मेस्सीशिवाय अर्जेंटिनासाठी सेमीफायनलमध्ये आव्हान पेलणं सोपं नाही. मेस्सी सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही याबाबत अद्याप काही निश्चित नाही. अर्जेटिंनाने दोन गोलची आघाडी अखेरच्या काही मिनिटात गमावल्यावंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँडला 4-3 ने हरवलं. आता सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना क्रोएशियासोबत होणार आहे. क्रोएशियाने क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलला हरवून मोठी उलथापालथ केली. आता सेमीफायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यात मेस्सीवर बंदीची टांगती तलवार असणार आहे. हेही वाचा :  FIFA : सेमीफायनलचे ४ संघ ठरले, दोन मित्र एकमेकांशी भिडणार फिफाने अर्जेंटिना फुटबॉल महासंघाविरोधात आरोप करताना त्यांच्या आचारसंहितेचा, सामन्यावेळच्या व्यवस्था आणि सुरक्षेचा दाखला दिला आहे. अर्जेंटिनाचे खेळाडु आणि प्रशिक्षक मैदानात आले होते. त्यामुळे काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत सामना बरोबरीत झाल्यानतंर आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकल्यावरही वातावरण गरम होते. फिफाने म्हटलं की, एका सामन्यात पाच यलो कार्ड मिळाल्यानतंर संघावर गैरवर्तनाचा आरोप लागलो आणि त्यानुसार अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यावर नियमानुसार कारवाई सुरू केली आहे. दोन्ही संघांना समान 15 हजार स्विस फ्रँक म्हणजेच 16 हजार डॉलर्सचा दंड लागू शकतो. याआधी वर्ल्ड कपमध्ये गैरवर्तन प्रकरणी सौदी अरेबियाच्या संघाला दोन वेळा दंड ठोठावण्यात आला होता. हेही वाचा :  VIDEO : इंग्लंडच्या कॅप्टनने केली मोठी चूक, एम्बाप्पेला आवरलं नाही हसू

 अर्जेंटिना दोषी आढळल्यास कर्णधार मेस्सीवर बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे सेमीफायनलमध्ये मेस्सीला खेळता येणार नाही. मेस्सी हा अर्जेंटिनाचा स्टार असून संघाची कामगिरी त्याच्यावरच अवलंबून आहे. मेस्सीवर बंदी घातली गेली तर अर्जेंटिनाची वर्ल्ड कप जिंकण्याची वाट खडतर होईल. लियोनेल मेस्सीचा हा पाचवा वर्ल्ड कप आहे आणि अखेरचा सुद्धा ठरू शकतो. त्यामुळे 20 वर्षांपासूनचं स्वप्न बंदीमुळे अर्धवट राहण्याचा धोकाही आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात