मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /FIFA Final : मेस्सीसोबत Jio Cinema ने केला डिजिटल युगात नवा 'गोल', टीव्हीला दिला पर्याय

FIFA Final : मेस्सीसोबत Jio Cinema ने केला डिजिटल युगात नवा 'गोल', टीव्हीला दिला पर्याय

स्पोर्ट्स 18 आणि स्पोर्ट्स 18 एचडी चॅनेलवरून प्रसारण होत होते तर जिओ सिनेमा अॅपवर फिफा वर्ल्ड कपमधील सामने लाइव्ह पाहता येत होते.

स्पोर्ट्स 18 आणि स्पोर्ट्स 18 एचडी चॅनेलवरून प्रसारण होत होते तर जिओ सिनेमा अॅपवर फिफा वर्ल्ड कपमधील सामने लाइव्ह पाहता येत होते.

स्पोर्ट्स 18 आणि स्पोर्ट्स 18 एचडी चॅनेलवरून प्रसारण होत होते तर जिओ सिनेमा अॅपवर फिफा वर्ल्ड कपमधील सामने लाइव्ह पाहता येत होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कप 2022 ची थरारक अशा सामन्याने सांगता झाली. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सचा अंतिम सामना रंगतदार झाला. अवघ्या जगाच्या नजरा या सामन्याकडे लागल्या होत्या. विशेष म्हणजे, टीव्हीवर हा सामना तर पाहिला जातच होता, पण डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा सामना सर्वाधिक पाहिला गेला. Jio Cinema ने यात नवा रेकॉर्ड केला आहे.

श्वास रोखून धरणारा अखेरच्या क्षणापर्यंतचा हा सामना प्रत्येक फुटबॉल प्रेमीने आपल्या डोळ्यात साठवला. भारतासह जगभरात हा सामना प्रत्येकांपर्यंत मोफत पोहोचवण्याचे काम Jio Cinema ने चोखपणे पार पडले. जवळपास 110 मिलियन पेक्षा जास्त प्रेक्षकांनी हा सामना Jio Cinema वर पाहिला.

(Jio Cinema ने मोडला रेकॉर्ड, 110 मिलियन प्रेक्षकांनी लुटला फिफा वर्ल्ड कपचा आनंद)

कतारमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव केला. कतारमध्ये झालेला हा वर्ल्ड कप भारतात आतापर्यंत सर्वाधिक प्रेक्षक लाभलेला आणि पाहिलेला वर्ल्ड कप होता. पहिल्यांदाच टीव्हीपेक्षा डीजिटल प्रेक्षकांची संख्या सर्वाधिक होती. स्पोर्ट्स 18 आणि स्पोर्ट्स 18 एचडी चॅनेलवरून प्रसारण होत होते तर जिओ सिनेमा अॅपवर फिफा वर्ल्ड कपमधील सामने लाइव्ह पाहता येत होते. विशेष म्हणजे, हा सामने मोफत पाहता येत होते.

अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सचा सामना सुरू होण्याआधी रेकॉर्डब्रेक Jio Cinema अॅप डाऊनलोड करण्यात आले. तीन तास चाललेला हा थरार लोकांनी Jio Cinema वर पाहिला. जवळपास 110 मिलियन प्रेक्षकांनी हा सामना Jio Cinema वर पाहिला. याआधी आयपीएल आणि वर्ल्डकपचे सामने हे मोबाईलवर पाहता आले. पण अर्जेंटिना आणि फ्रान्सचा सामना हा क्रिकेट सामन्यांपेक्षा मोठे संख्येनं पाहिला गेला.

(Ranveer-Deepika In FIFA : अर्जेंटिना जिंकताच दीपिकाने रणवीरला मारली मिठी, तो म्हणाला खरी ट्रॉफी तर...)

जिओ सिनेमाने 20 नोव्हेंबरपासून आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही सिस्टिमवर तीन आठवड्यात सर्वाधिक डाऊनलोड केलेलं फ्री अॅप ठरलं आहे. याआधी कधीच पाहण्यात आला नव्हता असा हाइप मोड देऊन जिओ सिनेमाने प्रेक्षकांचा लाइव्ह सामना पाहण्याचा अनुभव आणखी सुंदर केला. व्हॉइस अॅक्टिव्हेटेड एआर लेन्ससाठी स्नॅप इंकसोबत भागिदारी करण्यात आली होती. तर महिंद्रासोबत भारतात फुटबॉलमधील अनहेल्ड हिरोजचा सन्मान करणारी एक सिरीज तयार करण्यात आली होती.

First published:

Tags: FIFA, FIFA World Cup