मुंबई, 19 डिसेंबर : सध्या जगभरात फिफा वर्ल्ड कप 2022 ची चर्चा सुरु आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या या अंतिम सामन्यासाठी अनेकांनी हजेरी लावली होती. विशेष करुन बॉलिवूडकरांनी या सामन्यावेळी खास हवा केली. त्यांचे अनेक व्हिडीओ, फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. प्रत्येक कलाकारची वेगळी झलक यासामन्यावेळी पहायला मिळाली. अशातच बी-टाऊनमधील पॉवर कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणनचाही एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीदरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित होते. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्याचा रणवीर आणि दीपिकाने मनापासून आनंद लुटला. या सामन्यावेळीचे दोघांचे अनेक क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातीलच एक दोघांचा क्युट व्हिडीओही पहायला मिळाला. ज्यामध्ये सामन्यावेळी दोघे एकमेकांनी मिठी मारत आहेत.
रणवीर फुटबॉलचा खूप मोठा चाहता आहे त्यामुळे मॅच पाहण्यासाठी तो थेट कतारला पोहचला. तिथे पोहचताच त्याने फोटो व्हिडीओ शेअर केले. व्हिडीओमधील रणवीरचा उत्साह नेहमीप्रमाणे हाय असलेला पहायला मिळाला. रणवीरने दीपिका पादुकोणने अंतिम फेरीपूर्वी विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करत असतानाचे व्हिडीओही त्याच्या स्टोरीला शेअर केले. त्याने दीपिकासोबत फोटो शेअर करत लिहिलं, ‘खरी ट्रॉफी तर माझ्याकडे आहे’. दरम्यान, 3-3 अशा बरोबरीनं अर्जेंटिनाने फ्रान्सवर विजय मिळवला आणि इतिहास घडवला. या ऐतिसाहिक सामना पाहणं म्हणजे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. जगभरातून मेस्सीवर कौतुकांची थाप पडत आहे. त्याचं वर्ल्ड कप उंचावण्याचं स्वप्न पूर्ण झालं. फिफा वर्ल्ड कपमध्ये अखेरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामना थरारक होता. मेस्सीचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. सामना पाहून बॉलिवूडकरही भारावून गेले होते. रणवीर आणि दीपिकाचा हा खास क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय आहे.