फिफा वर्ल्ड कप 2022 चा अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सचा सामना याची देही याची डोळा अवघ्या जगाने पाहिला. श्वास रोखून धरणारा अखेरच्या क्षणापर्यंतचा हा सामना प्रत्येक फुटबॉल प्रेमीने आपल्या डोळ्यात साठवला. भारतासह जगभरात हा सामना प्रत्येकांपर्यंत मोफत पोहोचवण्याचे काम Jio Cinema ने चोखपणे पार पडले. जवळपास 110 मिलियन पेक्षा जास्त प्रेक्षकांनी हा सामना Jio Cinema वर पाहिला.
अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सचा सामना सुरू होण्याआधी रेकॉर्डब्रेक Jio Cinema अप डाऊनलोड करण्यात आले. तीन तास चाललेला हा थरार लोकांनी Jio Cinema वर पाहिला. जवळपास 110 मिलियन प्रेक्षकांनी हा सामना Jio Cinema वर पाहिला. याआधी आयपीएल आणि वर्ल्डकपचे सामने हे मोबाईलवर पाहता आले. पण अर्जेंटिना आणि फ्रान्सचा सामना हा क्रिकेट सामन्यांपेक्षा मोठे संख्येनं पाहिला गेला.
जिओ सिनेमाने 20 नोव्हेंबरपासून आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही सिस्टिमवर तीन आठवड्यात सर्वाधिक डाऊनलोड केलेलं फ्री अॅप ठरलं आहे. याआधी कधीच पाहण्यात आला नव्हता असा हाइप मोड देऊन जिओ सिनेमाने प्रेक्षकांचा लाइव्ह सामना पाहण्याचा अनुभव आणखी सुंदर केला. व्हॉइस अॅक्टिव्हेटेड एआर लेन्ससाठी स्नॅप इंकसोबत भागिदारी करण्यात आली होती. तर महिंद्रासोबत भारतात फुटबॉलमधील अनहेल्ड हिरोजचा सन्मान करणारी एक सिरीज तयार करण्यात आली होती.