Home /News /viral /

VIDEO : शिंगांसह फुटबॉल खेळू लागलं हरिण, गोल केल्यानंतर केलं भन्नाट सेलिब्रेशन!

VIDEO : शिंगांसह फुटबॉल खेळू लागलं हरिण, गोल केल्यानंतर केलं भन्नाट सेलिब्रेशन!

प्रयत्न केल्यानंतर मिळालेल्या यशाचा आनंद एक वेगळा असतो. मात्र तुम्ही कधी प्राण्यांना कसा आनंद साजरा करताना पाहिले आहे का?

    नवी दिल्ली, 03 जानेवारी : प्रयत्नांती परमेश्वर अशी एक प्रचलित म्हण मराठीमध्ये वापरली जाते. त्यामुळं प्रयत्न केल्यानंतर मिळालेल्या यशाचा आनंद एक वेगळा असतो. मात्र तुम्ही कधी प्राण्यांना कसा आनंद साजरा करताना पाहिले आहे का? असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हरिण शिंगासह फुटबॉल खेळताना दिसत आहे. एका पार्कमध्ये हे हरिण एकटंच फुटबॉल खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) अधिकारी सुशांत नंदा यांनी 2 जानेवारीला ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये, शिंगासह हरिण फुटबॉल गोलपोस्ट पर्यंत घेऊन जातो आणि गोल करतो. हा गोल झाल्यानंतर उड्या मारत त्याचं सेलिब्रेशनही हरिण करताना दिसत आहे. वाचा-चक्क मेंढीने घातली ब्रा, हे आहे सोशल मीडियावर VIRAL झालेल्या फोटो मागचे रहस्य लोकांना हरिणाची ही सेलिब्रेशन स्टाईल भयंकर आवडली आहे. फुटबॉल खेळल्यानंतर हरिण पुन्हा जंगलात जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) अधिकारी सुशांत नंदा यांनी लिहिले आहे की, “आपले लक्ष्य साध्य करताना आनंदी रहा, समोर विरोधक नसले तरी”. वाचा-VIDEO बायको सांगत होती काम, नवरा होता फोनमध्ये बिझी नंतर काय झालं तुम्हीच पाहा वाचा-तो VIDEO VIRAL झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी मागितली माफी हा व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच 600 हून अधिक लोकांनी लाईक तर 156 री-ट्वीट केले आहे. एका युझरनं यावर, “मी नवीन वर्षाचा सर्वात सुंदर व्हिडिओ पाहिला आहे.” दुसर्‍या युझरने लिहिले की, “हरिणांचा उत्साह पाहून मला मजा आली. अगदी लहान आनंद देखील साजरा केला पाहिजे हा धडा शिकवतो. दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप कळलेले नाही.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या