जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / बापरे...थंड नाश्ता दिला म्हणून सासऱ्याने केली सुनेची गोळी झाडून हत्या

बापरे...थंड नाश्ता दिला म्हणून सासऱ्याने केली सुनेची गोळी झाडून हत्या

बापरे...थंड नाश्ता दिला म्हणून सासऱ्याने केली सुनेची गोळी झाडून हत्या

शामलाल यांना प्रचंड राग झाला. त्यांचा राग एवढा अनावर आला की त्यांनी आपल्या 12 बोअरच्या पिस्तुलातून आपल्या सूनेवरच गोळ्या झाडल्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

फरीदकोट 03 जानेवारी : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे सर्व देशात असंतोष निर्माण झालेला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदे करण्याची मागणीही होतेय. देशभरात महिलांविरुद्धच्या अत्याचारात वाढ होत असतांनाच पंजाबमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आलीय. केवळ थंड नाश्ता दिला म्हणून एका सासऱ्याने आपल्या सुनेची हत्या केली. घटनेनंतर हा हत्यारा सासरा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या खूनी सासऱ्याला तातडीने अटक करावी अशी मागणी होत आहे. शामलाल असं या हत्या करणाऱ्या सासऱ्याचं नावं असून तो हवाई दलाचा माजी अधिकारी आहे. नीलम कुमारी असं पीडीत सुनेचं नाव असून तिला एक लहान मुलगीही आहे. नीलम यांचा नवरा हा काही महिन्यांपासून आजारी असल्याने घरीच असतो. नीलम या घरात इतर कामांमध्ये व्यस्त होत्या. त्याच वेळी शामलाल यांनी त्यांना नाश्ता देण्यास सांगितलं होतं. मात्र घरातल्या इतर कामांमध्ये त्या व्यस्त असल्याने सासऱ्यांना नाश्ता देण्यास त्यांना थोडा उशीर झाला. त्याचवेळी नाश्ता थंडही झाला होता. याचा शामलाल यांना प्रचंड राग आला. त्यांचा राग एवढा अनावर झाला की त्यांनी आपल्या 12 बोअरच्या पिस्तुलातून नीलम यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात नीलम या जागीच ठार झाल्या.

मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेवर अनुराधा पौडवाल यांची पहिली प्रतिक्रिया

घटनेनंतर शामलालने घरातून पळ काढला. त्यांनी वापरलेलं पिस्तुल हे लायन्सस असलेलं होतं. त्यांचा स्वभाव हा अतिशय तापट होता. त्यांची घरातही प्रचंड दहशत होती असं त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलंय. शामलाला अटक करण्यासाठी पोलिसांनी आता एक विशेष पथक स्थापन केलं असून त्याचा शोध सुरू आहे. शामलाल अटक करून त्याला फाशी द्या अशी मागणी नीलम यांच्या कुटुंबीयांनी केलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात