जाहिरात
मराठी बातम्या / देश / तो पळत राहिला तरी मित्र करत होता चाकूने वार, हत्येचा थरारक VIDEO

तो पळत राहिला तरी मित्र करत होता चाकूने वार, हत्येचा थरारक VIDEO

तो पळत राहिला तरी मित्र करत होता चाकूने वार, हत्येचा थरारक VIDEO

एका शुल्लक कारणामुळे मित्रानेच आपल्या मित्राची निर्घृण हत्या केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

वापी, 03 जानेवारी: वापीमध्ये हत्येचा एक थरारक व्हिडीओ समोल आला आहे. इमारतीच्या पार्किंगमध्येच एका अल्पवयीन मुलानं आपल्या मित्रावर चाकूने वार करत हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेआधी या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला होता. आता वापी पोलीस स्थानकात हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेचा उलघडा झाला. या व्हिडीओमध्ये मृत तरुण आपल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये येत असतानाच त्याच्या मित्रांनं अचानक चाकूने वार करण्यास सुरुवात केली. दरम्यान याचा जीव वाचवण्यासाठी एका महिलेनं मारेकऱ्याला हातानं मारण्याचा प्रयत्न केला, तिच्यावरही मारेकऱ्यानं चाकूने काही वार केले. यातच मृत तरुणानं आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला आणि घरी पोहचला. घरातल्यांना मुलावर वार झाल्याचे कळताच त्यांनी त्याला त्वरित दवाखान्यात नेले. मात्र शरिरातून जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळं रोहितचा जीव वाचू शकला नाही. वाचा- काँग्रेसच्या वादग्रस्त ‘बुकलेट’वर बंदी घाला, भाजपसह शिवसेनाही आक्रमक वाचा- औरंगाबादमध्ये समसमान मते पडल्याने मोठा वाद, बंडखोर उमेदवारासोबत भिडले शिवसैनिक

वाचा- पॉर्न बघण्याच्या नशेत हिंसक होत आहेत भारतातील तरुण, धक्कादायक आकडेवारी समोर वाचा- VIDEO कोल्हापुरात महिलांनी खासदारांसमोरच घेतल्या नदीत उड्या मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही अल्पवयीन मुले एकमेकांना ओळखत होती आणि गेल्या बर्‍याच वेळापासून त्या दोघांमध्ये कशाबद्दल तरी भांडण होते. दरम्यान, पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाची ओळख पटवली आहे आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime
  • First Published :
जाहिरात
जाहिरात