नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : आयपीएल २०२१चा (IPL2021)अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स (CSKvsKKR)यांच्यात उद्या म्हणजेच 15 ऑक्टोबरला रंगणार आहे. तत्पूर्वी क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या एका खेळाडूला बीसीसीआयने(Dinesh Karthik reprimanded for breaching IPL Code of Conduct) फटकारले आहे.
कोलकात्याने दिल्लीला एका रोमहर्षक सामन्यात हरवले, पण या सामन्यानंतर या संघाला एक वाईट बातमी मिळाली आहे. संघाचा अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार दिनेश कार्तिकला शिक्षा झाली आहे. कार्तिकला सामन्यानंतर त्याच्या त्याच्या चुकीच्या कृतीबद्दल आयपीएलने फटकारले आहे.
हे वाचा- '...तर ऋतुराजचे शतक हुकेल' ; CSK च्या फॅन्सचा सायली संजीवला मौलिक सल्ला
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर रागात हाताने स्टंप्स उखडले होते. याबरोबरच ड्रेसिंग रूमकडे जातानाही तो रागात दिसला होता. त्याने केलेले हे वर्तन आयपीएलच्या आचारसंहितेच्या नियमांच्या बाहेरचे असल्याने बीसीसीआयने त्याला फटकारले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक क्वालिफायर 2 सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात लीगच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. दिनेश कार्तिकने लेव्हल 1 च्या कलम 2.2 चे उल्लंघन केले आहे. तसेच त्याने आपली चूक देखील मान्य केली आहे. लेव्हल 1 च्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर संघांच्या रेफरींचा निर्णय अंतिम निर्णय असतो.
हे वाचा- DCvKKR; व्यंकटेश-आवेशचे मैत्रीप्रेम सोशल मीडियावर तुफान व्हायरल
केकेआर आणि दिल्लीमधील काल झालेला सामना म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील काही चुरशीच्या सामन्यांपैक एक ठरला. दिल्लीच्या 136 या सोप्या लक्षाचा पाठलाग केकेआरने उत्तम सुरु केला. एका क्षणी केकआरला 24 चेंडूत केवळ 13 धावांची गरज होती. सोबत त्यांच्या हातात 8 विकेट्सही होत्या.
पण त्याच क्षणी दिल्लीच्या गोलंदाजानी जादूई गोलंदाजी करत केकेआरचे एक-एक फलंदाज तंबूत धाडले. एकाक्षणी 2 चेंडूत 6 धावांची गरज केकेआरला असतानाच राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.