मुंबई, 14 ऑक्टोबर : क्रिकेट जग (Cricket)आणि बॉलीवूडचे(bollywood)प्रेमाचे नाते हे सर्वश्रुत आहे. पण आता क्रिकेट जगतातले प्रेमाचे वारे हे मराठी सिनेसृष्टीत (marathi entertainment news)वाहताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड (ruturaj gaikwad)आणि मराठी सिनेसृष्टीतील गोड चेहरा म्हणजेच सायली संजीव(sayali sanjeev) यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. अशातच आयपीएल(IPL2021) आता अंतिम टप्प्यात आली असून सीएसकेची अखेरची लढत केकेआर(CSKvsKKR)संघासोबत होणार आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर एका चाहत्याने सायलीच्या फोटोवर कमेंट करत सामन्याआधी मौलिक सल्ला दिला आहे.
आयपीएल2021 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात 15 ऑक्टोबरला रंगणार आहे. यातच सीएसकेचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या फार्मात आहे.
हे वाचा- 'आज तुमचे हे चांगले खेळले'; ऋतुराजच्या खेळीमुळे सायली संजीववर चाहते भलतेच खूश
तर सायली आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एकापेक्षा एक फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधत आहे. नुकतंच सायलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिने फिकट अबोली रंगाचा चिकणकरी डिझाईनचा कुर्ता परिधान केला आहे. यामध्ये ती खुपच सुंदर दिसत असून कमेंट्स बॉक्समध्ये चाहत्यांनी ऋतुराजच्या नावाचा जप केला आहे.
ऋतुराज आणि तु खरचं रिलेशनमध्ये आहात का ?, ऋतू भाई का राज, . कधी भेटेल दोघांची पोस्ट एकत्र..... दुबईमध्ये तर ऋतू का राजा चल रहा है, अशा विविध कमेंट्स सायलीच्या फोटोवर आल्या आहेत. मात्र, एकाने आयपीएलमधील होणाऱ्या सीएसकेच्या अंतिम सामन्यापूर्वीची आठवण करुन देत, 'जरा दोन दिवस पोस्ट अपलोड करू नको , आयपीएल फायनल मध्ये ऋतुराजचे शतक हुकेल तुमच्या पोस्ट मुळे'' असा मौलिक सल्ला दिला आहे.
तसेच दुसऱ्या एका चाहत्याने वहिनी दादाला बेस्ट ऑफ लक बोलला का नाही.... आम्हाला तुमची जोडी खूप आवडते... कधी हो चल गायकवाड घराण्याची राणी असे म्हटले आहे.
ऋतुराज गायकवाडनं राजस्थान विरुद्ध शतक झळकावलं आहे तर यंदाच्या सिझनमध्ये त्यानं चार अर्धशतकं झळकावली आहेत. ऋतुराज सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही 22 षटकार लगावत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच युएईमध्ये ऋतुराजने सर्वात अधिकवेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावले आहेत. त्यामुळे, 14 व्या हंगामात केकेआरसोबत होणाऱ्या सीएसकेच्या अंतिम लढतीत सर्वांचे लक्ष ऋतुराजच्या खेळीकडे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, IPL 2021, KKR, Sayali Sanjeev