नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : आयपीएल(IPL2021) 14 वा सीझन अंतिम टप्प्यात पोहचला आहे. काल स्पर्धेतील क्वालिफायर 2 मध्ये पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला 3 विकेट्सनी (DCvKKR)पराभव पत्करावा लागला. दरम्यान, या सामन्यापूर्वीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दोन विरोधी संघातील खेळाडूंमधील मैत्रीप्रेम पाहायला मिळत आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या इस्टांग्राम अकाऊंटवर विरोधी संघातील वेगवान गोलंदाज आवेश खान फलंदाज व्यंकटेश अय्यरला आपल्या हाताने घास भरवत असलेला फोटो शेअर केला आहे. तसेच, हा फोटो शेअर करताना कोलकाता संघाने ‘तेरा यार हूं मै’ अशी कॅप्शन दिली आहे. हे वाचा- T20 World Cup: हार्दिक पांड्या बॉलिंग करणार का? अखेर BCCI नं दिलं उत्तर
कोलकाता नाईट रायडर्सने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. या फोटोला आतापर्यंत 50 हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर मैत्रीप्रेम पाहून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आवेश खान आणि व्यंकटेश अय्यर यांनी आयपीएल 2021 स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. आवेश खानने आतापर्यंत एकूण 24 गडी बाद केले आहेत. तर व्यंकटेश अय्यरबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण 9 सामन्यात 320 धावा केल्या आहेत. यासह गोलंदाजी करताना त्याने 3 गडी बाद केले आहेत. या दरम्यान त्याने 2 अर्धशतक झळकावले आहेत. हे वाचा- मोठी बातमी: रवी शास्त्रीनंतर द्रविड होणार टीम इंडियाचा कोच! या अप्रतिम खेळीच्या जोरावर व्यंकटेश अय्यर आणि आवेश खान यांना आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी यूएईमध्ये थांबण्यास सांगितले आहे. आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर, हे दोघेही खेळाडू यूएईमध्ये थांबतील आणि आगामी स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना सराव करण्यात मदत करतील.