Home /News /sport /

IPL 2022 : KKR च्या खेळाडूचा नवा रेकॉर्ड, रोहित आणि गेललाही टाकलं मागं

IPL 2022 : KKR च्या खेळाडूचा नवा रेकॉर्ड, रोहित आणि गेललाही टाकलं मागं

KKR vs Punjab Kings: कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) फास्ट बॉलर उमेश यादवची (Umesh Yadav) फास्ट बॉलिंग आणि आंद्रे रसेलच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जचा (Punjab Kings) 6 विकेट्सनं पराभव केला.

    मुंबई, 2 एप्रिल : कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) फास्ट बॉलर उमेश यादवची (Umesh Yadav) फास्ट बॉलिंग आणि आंद्रे रसेलच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जचा (Punjab Kings) 6 विकेट्सनं पराभव केला. उमेश यादवं 23 रन देत 4 विकेट्स घेतल्या. तर रसेलनं 30 बॉलमध्ये 70 रनची आक्रमक खेळी खेळली. उमेशला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्याचबरोबर त्यानं एका टीमच्या विरूद्ध सर्वात जास्त वेळा 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार पटकावण्याचा रेकॉर्ड केला आहे. उमेशनं यामध्ये ख्रिस गेल आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा यांना मागे टाकलं आहे. मुंबईतील वानखेडेवर झालेल्या या मॅचमध्ये पंजाबची टीम 18.2 ओव्हर्समध्ये 137 रनवर ऑल आऊट झाली. त्यानंतर केकेआरनं 14.3 ओव्हर्समध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात टार्गेट पूर्ण केले. उमेशला पंजाब किंग्ज विरूद्ध सहाव्यांदा 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला. रोहित शर्मा आणि ख्रिस गेल यांना कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध तर युसूफ पठाणला डेक्कन चार्जर्स विरूद्ध 5 वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. उमेशनं मॅचनंतर बोलताना सांगितलं की, 'मला कठोर मेहनत करणे आवश्यक आहे. वय वाढत आहे. तुम्ही एकच फॉर्मेट खेळता त्यावेळी मी जास्तीत जास्त ओव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतो. मी नेट्समध्ये मयंक अग्रवालसोबत बराच खेळलो आहे. तो बॅकफुटवर खेळणार हे मला माहिती होते. त्यामुळे मी फुल लेन्थ बॉलिंग करण्याचे ठरवले होते. सध्या मला मिळत असलेलं यश हे मी कोच सोबत केलेल्या अभ्यासामुळे मिळत आहे. तुम्ही प्रती तास  140 किलोमीटर पेक्षा जास्त वेगानं बॉलिंग करत असाल तर तुम्हाला स्टम्पवर बॉलिंग करण्याची गरज आहे.' On This Day : धोनीचा अजरामर सिक्स, सचिनचे अश्रू आणि संपूर्ण देशानं रात्रभर साजरी केली दिवाळी! कोलकाता नाईट रायडर्सचा हा 3 मॅचमधील दुसरा विजय आहे. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता. तीन मॅचनंतर 4 पॉईंट्ससह केकेआरची टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Ipl 2022, KKR, Punjab kings, Rohit sharma, Umesh yadav

    पुढील बातम्या