मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

On This Day : धोनीचा अजरामर सिक्स, सचिनचे अश्रू आणि संपूर्ण देशानं रात्रभर साजरी केली दिवाळी!

On This Day : धोनीचा अजरामर सिक्स, सचिनचे अश्रू आणि संपूर्ण देशानं रात्रभर साजरी केली दिवाळी!

टीम इंडियानं आयसीसी वन-डे वर्ल्ड कप जिंकण्याच्या ऐतिहासिक घटनेला आज (On This Day) 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतीय टीमनं फायनलमध्ये श्रीलंकेचा 6 विकेट्सनं पराभव करत विजेतेपद पटकावले.

टीम इंडियानं आयसीसी वन-डे वर्ल्ड कप जिंकण्याच्या ऐतिहासिक घटनेला आज (On This Day) 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतीय टीमनं फायनलमध्ये श्रीलंकेचा 6 विकेट्सनं पराभव करत विजेतेपद पटकावले.

टीम इंडियानं आयसीसी वन-डे वर्ल्ड कप जिंकण्याच्या ऐतिहासिक घटनेला आज (On This Day) 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतीय टीमनं फायनलमध्ये श्रीलंकेचा 6 विकेट्सनं पराभव करत विजेतेपद पटकावले.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 2 एप्रिल : टीम इंडियानं आयसीसी वन-डे वर्ल्ड कप जिंकण्याच्या ऐतिहासिक घटनेला आज (On This Day) 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये (Cricket World Cup 2011 Final) महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) टीम इंडियानं श्रीलंकेचा 6 विकेट्सनं पराभव करत अजिंक्यपद पटकावले. कपिल देवच्या टीमनं 1983 साली केलेल्या कामगिरीनंतर तब्बल 28 वर्षांनी भारतीय टीमनं वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं सिक्स लगावात विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.

भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या तीन देशांमध्ये 2011 साली वर्ल्ड कप स्पर्धा झाली. या तीनपैकी भारत आणि श्रीलंका हे दोन यजमान देश स्पर्धेच्या फायनलमध्ये एकमेकांसोर होते. क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात 2 यजमान देशांमध्ये फायनल मॅच होण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. भारताने पाकिस्तानचा तर श्रीलंकेनं न्यूझीलंडचा पराभव करत वर्ल्ड कप फायनल गाठली होती. फायनल मॅचमध्ये श्रीलंकेचा कॅप्टन कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याने टॉस जिंकला. संगकराने टॉस जिंकताच पहिल्यांदा बॅटींग घेण्यास क्षणाचाही उशीर केला नाही.

झहीर खानच्या अचूक स्पेलनं श्रीलंकेची सुरुवात संथ झाली. त्यांचे दोन्ही ओपनर 10 ओव्हरमध्ये आऊट झाले. त्यानंतर कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी श्रीलंकेची इनिंग सावरली. संगकारा आऊट झाला. पण जयवर्धने खेळत होता. श्रीलंकेच्या अनुभवी बॅट्समननं त्याचं संपूर्ण कौशल्य पणाला लावलं. शेवटच्या ओव्हर्समध्ये त्याने वेग वाढवला आणि शतक झळकावले. जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेनं भारतासमोर विजयासाठी 275 रनचं आव्हान ठेवलं.

भारताची खराब सुरुवात

वर्ल्ड कप फायनलचा विचार करता 275 हे आव्हानात्मक लक्ष्य होते. भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) शून्यावर आऊट झाला. त्यापाठोपाठ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 18 रनवर आऊट झाला. सचिन आऊट होताच वानखेडे स्टेडियमवर नाही तर फायनल मॅच पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या घरात काही काळ शांतता पसरली होती.

या अवघड परिस्थितीमध्ये गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) ही दिल्लीकर जोडी जमली. या दोघांनी रनरेट वाढणार नाही याची काळजी घेत धावफलक हलता ठेवला. अखेर दिलशाननं एक सुंदर कॅच घेत कोहलीला आऊट केलं.

धोनीची आश्चर्यकारक चाल

विराट कोहली आऊट झाल्यानंतर बॅटींग ऑर्डर प्रमाणे युवराज सिंह (Yuvraj Singh) येणे अपेक्षित होते. युवराज संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात होता. पण महेंद्रसिंह धोनीनं स्वत:ला बढती देण्याचा निर्णय घेतला. धोनीची ती चाल कमालीची यशस्वी झाली. महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या क्रिकेट करियरमधील सर्वोत्तम खेळ त्या दिवशी केला.

IPL 2022: CSK vs LSG मॅचनंतर समोरासमोर आले धोनी-गंभीर अन्..., VIRAL होतोय हा VIDEO

गौतम गंभीरचं शतक फक्त 3 रननं हुकलं. पण धोनी थांबला नाही. तो सहज पद्धतीनं खेळत होता. त्यानं श्रीलंकेच्या सर्व बॉलर्सचा समाचार घेतला. युवराज सिंहसोबत वेगाने रन जमवले. त्यानंतर अखेर तो क्षण आला...49 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर धोनीनं कुलसेखराला सिक्स मारत भारताच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

धोनीच्या त्या सिक्सनंतर त्या रात्री संपूर्ण देशात दिवाळी साजरी झाली.

First published:

Tags: Cricket news, MS Dhoni, On this Day, Team india