मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 WC : 'या' पाच चुकांमुळे टीम इंडियाला गमवावे लागले सलग 2 वर्ल्ड कप!

T20 WC : 'या' पाच चुकांमुळे टीम इंडियाला गमवावे लागले सलग 2 वर्ल्ड कप!

टीम मॅनेजमेंटनं केलेल्या 5 मुख्य चुकांमुळे एक वर्षभराच्या कालावधीमध्ये भारताला दोन वर्ल्ड कप गमवावे लागले आहेत.

टीम मॅनेजमेंटनं केलेल्या 5 मुख्य चुकांमुळे एक वर्षभराच्या कालावधीमध्ये भारताला दोन वर्ल्ड कप गमवावे लागले आहेत.

टीम मॅनेजमेंटनं केलेल्या 5 मुख्य चुकांमुळे एक वर्षभराच्या कालावधीमध्ये भारताला दोन वर्ल्ड कप गमवावे लागले आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 14 नोव्हेंबर :  ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्याचं भारतीय फॅन्सचं स्वप्न अपूर्ण राहिलं.  अ‍ॅडलेडमध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या सेमी फायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा 10 विकेट्सनी पराभव झाला. या वेळच्या टी-20 वर्ल्ड कपमधील भारताची ही सर्वात वाईट कामगिरी ठरली. त्यामुळे क्रिकेट फॅन्स आणि काही माजी खेळाडू टीम इंडियावर नाराज आहेत. त्यांनी जाहीरपणे टीम मॅनेजमेंटवर टीका केली आहे. कारण,  टीम मॅनेजमेंटनं अशा काही चुका केल्या आहे की ज्यामुळे एक वर्षभराच्या कालावधीमध्ये भारताला दोन वर्ल्ड कप गमवावे लागले आहेत. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    गेल्या वर्षी, 2021 मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेत टीम इंडियाला लीग स्टेजमधूनच बाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर बरोबर वर्षाच्या कालावधीनंतर 2022 ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबर कालावधीमध्ये ऑस्‍ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात आला. त्यासाठी नवीन कोच राहुल द्रविड आणि नवीन कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहोचली होती.

    या टीमकडून सर्वांना खूप अपेक्षा होत्या. पाच आयपीएल जिंकण्याचा अनुभव असलेला कॅप्टन, 2021मधील वर्ल्ड कप किंवा त्याआधीच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये झालेल्या चुकांमधून धडा घेईल. त्या चुकांची पुनरावृत्ती करणार नाही, याची चाहत्यांना खात्री होती. पण, असं काहीही घडलं नाही. 2022 टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॅप्टन आणि मॅनेजमेंटनं अनेक चुका केल्या. त्यामुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा रिकाम्या हातानं मायदेशी परतावं लागलं आहे.

    इन-फॉर्म बॅटर्सकडं दुर्लक्ष

    वर्ल्ड कपसाठी टीम निवडताना टीम मॅनेजमेंटकडून निश्चितपणे काही चुका झाल्या. रोहित शर्मा आणि शिखर धवनची ओपनिंग जोडी वन-डे क्रिकेटमध्ये जबदस्त कामगिरी करत होती. पण, टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीममध्ये शिखर धवनचा समावेश झाला नाही. धवनला का वगळण्यात आलं, याचं उत्तर क्रिकेट चाहत्यांना आजपर्यंत सापडलं नाही. टीममधील वरिष्ठ खेळाडू विश्रांती घेतात तेव्हाच फक्त शिखर धवनची आठवण येते. शिखर धवनशिवाय डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या पृथ्वी शॉला गेल्या दोन वर्षांपासून दुर्लक्षित केलं गेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम इंडियाच्या कामगिरीवर याचा परिणाम होताना दिसत आहे.

    T20 World Cup Final : इंग्लंडच्या या 5 गोष्टींमधून टीम इंडिया शिकणार!

    केएल राहुलची पाठराखण

    टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल सातत्यानं खराब कामगिरी करूनही टीममध्ये राहिला. त्याच्या खराब कामगिरीमुळे टीमच्या ओपनिंग पार्टनशीपवर परिणाम झाला. 2021मधील टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत केएल राहुलनं 3, 18, 69, 50 आणि 54 अशी कामगिरी केली होती. त्यानंतर तो दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहिला.

    यंदा स्पर्धेपूर्वीच केएल राहुलच्या स्लो स्ट्राईक रेटबाबत चर्चा सुरू होती.  वर्ल्ड कप सुरू झाला तेव्हा केएल राहुलच्या खराब फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले गेले. तरी देखील त्याला सातत्यानं संधी मिळाली. 2022 टी-20 वर्ल्ड कपमध्ये केएल राहुलनं 4, 9, 9, 50, 51 आणि 5 अशी कामगिरी केली. त्यामुळे त्याला टी-20 टीममधून वगळण्याची मागणी होत आहे.

    प्लेईंग-11 न बदलण्याचा हट्ट

    कोणत्याही मॅचपूर्वी जेव्हा प्लेइंग-11चा विचार केला जातो, तेव्हा कॅप्टन आणि टीम मॅनेजमेंट समोरची टीम व ग्राउंडच्या कंडिशननुसार निर्णय घेतात. पण, टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया हा थंबरुल विसरल्याप्रमाणे वागत होती. एखादा बदल वगळता सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच प्लेईंग-11 खेळवण्याचा हट्ट कायम ठेवण्यात आला.

    खराब फॉर्म असूनही दिनेश कार्तिकला लवकर बाहेर बसवलं गेलं नाही. ऋषभ पंतला उशिरा संधी देण्यात आली. इतर टीम्सच्या लेगस्पिनर्स यश मिळत असल्याचं दिसत असूनही युजवेंद्र चहलला टीममध्ये जागा मिळाली नाही. यावरून, टीम इंडियाचं मॅनेजमेंट प्रतिस्पर्ध्यांचा किंवा ग्राउंडचा विचार करत नव्हतं, असं स्पष्ट होते.

    6 मॅचमध्ये 5 शतकं... तरीही महाराष्ट्राच्या 'या' बॅट्समनकडे बीसीसीआय करतेय दुर्लक्ष

    युजवेंद्र चहलकडे दुर्लक्ष

    2016 साली टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा युजवेंद्र चहल हा या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा बॉलर आहे. असे असूनही त्याला 2021 टी-20 वर्ल्ड कपमधून वगळ्यात आलं होतं. 2022 च्या वर्ल्ड कप टीममध्ये त्याची निवड तर झाली मात्र, त्याला एकही मॅच खेळू दिली नाही. टीम इंडिया फक्त रविचंद्रन अश्विनवर विसंबून राहिली. इतर टीम्सचे लेगस्पिनर्स सातत्याने यश मिळवत असताना भारताचा चहल मात्र, टीम मॅनेजमेंटच्या कारभारामुळं काहीही करू शकला नाही.

    कॅप्टन रोहित शर्माचा खराब फॉर्म

    टीम इंडियाच कॅप्टन रोहित शर्मा स्वत: खराब फॉर्मशी झुंज देताना दिसला. 2022 टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मानं 4, 53, 15, 2, 15 आणि 27 अशी कामगिरी केली आहे. एकीकडे केएल राहुल आणि दुसरीकडे रोहित शर्मा, दोघांच्या खराब कामगिरीमुळे वर्ल्ड कपमधील एकाही मॅचमध्ये टीम इंडियाला भक्कम ओपनिंग पार्टनशीप मिळाली नाही. भारताकडे असे अनेक ओपनिंग प्लेअर्स आहेत, ज्यांना गेल्या वर्षभरात आजमावलं गेलं. पण, वर्ल्ड कपमध्ये त्यांचा विचार केला गेला नाही. फ्लॉप ओपनिंग जोडीवर टीम मॅनेजमेंटनं विश्वास ठेवला.

    टीम इंडियाच्या धक्कादायक पराभवाला जबाबदार कोण? कॅप्टन रोहितने दिलं थेट उत्तर

    या 5  चुकांचा परिणाम म्हणून विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाला सलग दुसऱ्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप गमवावा लागला.

    First published:

    Tags: Cricket news, Rohit sharma, T20 world cup 2022