मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

India vs Pakistan : विराट टॉस जिंकल्यानंतर काय घेणार निर्णय? वाचा दुबईचा Pitch Report

India vs Pakistan : विराट टॉस जिंकल्यानंतर काय घेणार निर्णय? वाचा दुबईचा Pitch Report

टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2021) वेळापत्रक जाहीर झाल्यापासून प्रत्येक क्रिकेट फॅनला ज्याची उत्सुकता होती, ती मॅच आज (रविवारी) होणार आहे.

टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2021) वेळापत्रक जाहीर झाल्यापासून प्रत्येक क्रिकेट फॅनला ज्याची उत्सुकता होती, ती मॅच आज (रविवारी) होणार आहे.

टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2021) वेळापत्रक जाहीर झाल्यापासून प्रत्येक क्रिकेट फॅनला ज्याची उत्सुकता होती, ती मॅच आज (रविवारी) होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 24 ऑगस्ट: टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2021) वेळापत्रक जाहीर झाल्यापासून प्रत्येक क्रिकेट फॅनला ज्याची उत्सुकता होती, ती मॅच आज (रविवारी) होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या महामुकाबल्याकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लागलं आहे. फॉर्म, रेकॉर्ड आणि इतिहास या सर्व गोष्टी भारतीय टीमसोबत आहे.टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं आजवर 5 वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे.  दुबईमध्ये ही मॅच होणार असून या मॅचमध्ये दुबईच्या पिचची भूमिका महत्त्वाची असेल.

दुबईतून फॅन्ससाठी चांगली बातमी आहे. दुबईत संध्याकाळा हवामान स्वच्छ असून पावसाची कोणतीही शक्यता नाही. संध्याकाळी तापमान 31 डिग्रीपर्यंत असेल. दक्षिणेपासून पूर्वेकडं 7 किलोमीटर प्रती तास वेगानं हवा वाहणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आद्रता 70 टक्के असेल. त्यामुळे क्रिकेटसाठी अगदी उत्तम हवामान आहे.

गेल्या काही वर्षांचा रेकॉर्ड पाहिला तर हे पिच फारसे बदलले नाही. काही पिच स्लो आहेत. तर काहींवर फास्ट बॉलर्सला मदत मिळते. गेल्या दोन आयपीएल सिझनमधील येथील सरासरी स्कोअर 150 ते 160 आहे.  इथं फास्ट बॉलर्स हे जास्त यशस्वी ठरलेत. त्यांना 27 रननंतर एक विकेट मिळाली आहे. तर स्पिनर्सना एका विकेटसाठी 32 रन मोजावे लागले आहेत.

IND vs PAK, T20 World Cup: विराट आणि धोनी असतील तर टीम इंडियाचा विजय पक्का!

वर्ल्ड कपमधील या मॅचमध्ये टॉसचा रोल मेन असेल. यूएईमध्ये हवामान बदलत आहे. इथं संध्याकाळी दव पडल्यानं मैदानात दवबिंदू पडतात. आयपीएल 2020 च्या पहिल्या हाफमध्ये इथं उष्ण वातावरण होते. त्यामुळे टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या टीमनं 77 टक्के मॅच जिंकल्या होत्या. दुसऱ्या हाफमध्ये मात्र याच्या उलट चित्र दिसलं. या हाफमध्ये नंतर बॅटींग करणाऱ्या टीमनं 77 टक्के मॅच जिंकल्या आहेत.

IND vs PAK : 24 तास आधीच पाकिस्ताननं जाहीर केली टीम, पाहा कुणाला मिळाली संधी

दुबईच्या पिच लोकेशनची देखील नेहमी चर्चा होते. हे पिच स्कॉयर जवळ आहे. त्यामुळे एका बाजूला बाऊंड्री लहान आहे. त्यामुळे बॅटर या बाजूला टार्गेट करु शकतात. त्यामुळे त्या साईडनं बॉलिंग करणे सोपे नसेल. विशेषत: स्पिनर्सना त्या बाजूनं बॉलिंग देणं ही कॅप्टनसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup