मुंबई, 23 ऑक्टोबर: पाकिस्ताननं भारताविरुद्ध (India vs Pakistan) रविवारी होणाऱ्या महामुकाबल्यासाठी 12 सदस्यांची घोषणा केली आहे. बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्त्वाखालील टीममध्ये शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिज या दोन्ही अनुभवी खेळाडूंचा समावेश केला आहे. दुबईमध्ये रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता ही मॅच होणार आहे. या मॅचच्या 24 तास आधीच पाकिस्ताननं टीमची घोषणा केली आहे. या 12 खेळाडूंपैकी अंतिम 11 जणांची प्लेईंग 11 मध्ये निवड होणार आहे. आयसीसी रँकींगमध्ये भारत दुसऱ्या तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही टीम आजवर 5 वेळा टी20 वर्ल्ड कपमध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळल्या आहेत. त्या प्रत्येक मॅचमध्ये टीम इंडियानं विजय मिळवलाय. 2016 मधील टी20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मॅचमध्ये विराट कोहलीच्या 55 रनच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं विजय मिळवला होता. विराटनं फक्त 37 बॉलमध्ये 7 फोर आणि 1 सिक्सच्या जोरावर ही खेळी केली होती. भारताने 2014, 2012 मधील टी20 वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तान चा पराभव केला होता. तर 2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला सर्वात मोठा पराभव सहन करावा लागला. त्या वर्ल्ड कपमधील फायनलमध्ये पाकिस्तानला हरवत टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला होता.
Pakistan open T20 World Cup campaign on Sunday
— PCB Media (@TheRealPCBMedia) October 23, 2021
More details ➡️ https://t.co/jNJ0nfEIOg#WeHaveWeWill | #T20WorldCup
पाकिस्तानची टीम : बाबर आझम (कप्तान), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, मोहम्मद रिजवान, इमाद वसिम, मोहम्मद हफीज, शादाब खान, शोएब मलिक, हारिस रऊफ, हसन अली आणि शाहीन अफ्रिदी