मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs PAK, T20 World Cup: विराट आणि धोनी असतील तर टीम इंडियाचा विजय पक्का!

IND vs PAK, T20 World Cup: विराट आणि धोनी असतील तर टीम इंडियाचा विजय पक्का!

क्रिकेट फॅन्सना रविवारी संध्याकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या महामुकाबल्याची मेजवानी मिळणार आहे.  वन-डे आणि टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 ऑक्टोबर: क्रिकेट फॅन्सना रविवारी संध्याकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या महामुकाबल्याची मेजवानी मिळणार आहे.  वन-डे आणि टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये गेल्या 29 वर्षांमध्ये झालेली प्रत्येक मॅच टीम इंडियानं जिंकली आहे. पाकिस्तानला अजूनही 'मौका' ची प्रतीक्षा आहे. पण, यंदाही त्यांचं स्वप्न अपूर्ण राहण्याची चिन्हं आहेत.

या महामुकाबल्यापूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम(Babar Azam) या दोघांचीही सावध भूमिका आहे. टीम इंडिया या महामुकाबल्यासाठी सज्ज असल्याचं विराटनं सांगितलं आहे. तर वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या रेकॉर्डचा विचार करुन कोणतंही टेन्शन घेतलं नसल्याचं बाबरनं स्पष्ट केलंय.

टीम इंडियाचं पारडं जड

आयसीसीच्या वन-डे आणि टी20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या सर्व 12 मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमनं विजय मिळवला आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये 2007 साली या अभियानाला सुरुवात झाली. या वर्ल्ड कपमधील सर्व पाच मॅचमध्ये भारतीय टीमनं विजय मिळवला आहे. विराट कोहलीची टीम हे विजयी अभियान कायम राखण्याच्या उद्देशानं मैदानात उतरणार आहे. टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कपमधील यापूर्वीच्या सर्व मॅच महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) कॅप्टनसीखाली जिंकल्या आहेत. तो यंदा टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून विराटला साथ देत आहे.

India vs Pakistan: पाकिस्तानच्या मॅचपूर्वी धोनीनं घेतला विराटचा क्लास|

टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध कधीच आऊट झाला नाही, एवढच नाही तर त्याने भारताला तिन्ही वेळा विजयही मिळवून दिला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराटने पाकिस्तानविरुद्ध 78 नाबाद, 36 नाबाद आणि 55 नाबाद रनची खेळी केली. 3 मॅचपैकी 2 सामन्यांमध्ये तर विराट मॅन ऑफ द मॅच होता.

India vs Pakistan: विजयी भव! वाराणसीमधील गंगा आरतीमध्ये टीम इंडियासाठी प्रार्थना

पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक रन

विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक रन करणारा भारतीय खेळाडूही आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने 3 सामन्यांमध्ये 169 रन केले आहेत, यात त्याचा स्ट्राईक रेटही 130 चा आहे. दुसऱ्या कोणत्याही भारतीयाला 100 रनचा आकडाही पार करता आलेला नाही. गौतम गंभीर 75 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानकडून फक्त शोएब मलिकने भारताविरुद्ध 100 पेक्षा जास्त रन केले आहेत.

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup