मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध होणार 'करो वा मरो' मुकाबला, 'ही' गोष्ट ठरणार निर्णायक

T20 World Cup: टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध होणार 'करो वा मरो' मुकाबला, 'ही' गोष्ट ठरणार निर्णायक

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानच्या कामगिरीनंतर रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) मॅचला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. दोन्ही टीमसाठी ही मॅच जिंकणे कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यक आहे

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) सेमी फायनल गाठण्याचा पाकिस्तानचा मार्ग सोपा झाला आहे. पाकिस्ताननं मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा (Pakistan vs New Zealand) 5 विकेट्सनं पराभव केला. हा पाकिस्तानचा सलग दुसरा विजय असून त्यामुळे ही टीम ग्रुपमध्ये टॉपवर पोहचली आहे. पाकिस्तानच्या या कामगिरीनंतर रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) मॅचला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. दोन्ही टीमसाठी ही मॅच जिंकणे कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यक आहे. यामध्ये पराभूत होणाऱ्या टीमला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी नशिबाची मोठी साथ मिळणे आवश्यक असेल.

टीम इंडियानं 2007 साली टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. न्यूझीलंडनं आजवर एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. पण टी20 वर्ल्ड कपमध्ये त्यांचा टीम इंडियाविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. दोन देशांमध्ये झालेल्या दोन्ही मॅचमध्ये न्यूझीलंडनं विजय मिळवला आहे. 2016 साली नागपूरमध्ये झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं भारताचा 47 रननं पराभव केला होता.

बॅटींगचा प्रश्न

या वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मॅचमध्ये दोन्ही टीमच्या बॅटर्नसी निराशा केली आहे. पाकिस्तान विरुद्ध रोहित शर्मा आणि केएल राहुल झटपट आऊट झाले होते. विराट कोहली आणि ऋषभ पंतनं त्यानंतर टीमला सावरलं. टीम इंडियाला 6 व्या बॉलरची कमतरताही जाणवली. हार्दिक पांड्या अजूनही बॉलिंगसाठी फिट नाही. दुसरिकडं न्यूझीलंडच्या एकाही बॅटरला पाकिस्तान विरुद्ध 30 रन काढता आले नव्हते.

भारतानंतर पाकिस्तानचा न्यूझीलंडला धक्का, सेमी फायनलचा मार्ग आणखी सोपा

टॉस ठरणार महत्त्वाचा

दुबईतील मॅचमध्ये रात्री पडणारे दवबिंदूची भूमिका मोठी आहे. त्यामुळे या मॅचचा टॉस महत्त्वाचा ठरणार आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल. पाकिस्ताननं या मैदानावर टीम इंडियाला टार्गेटचा पाठलाग करताना पराभूत केले होते. टीम इंडियाला पहिल्यांदा बॅटींग करावी लागली तर किमान 180 रन करावे लागतील. 2021 मधील आयपीएल फायनल याच मैदानावर झाली होती. त्यामध्ये चेन्नईनं पहिल्यांदा बॅटींग करत 190 रन केले आणि विजय मिळवला होता.

First published:

Tags: New zealand, T20 world cup, Team india