मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : लखनऊची 'प्ले ऑफ' मध्ये एन्ट्री, गौतम गंभीरनं केलं जबरदस्त सेलिब्रेशन! VIDEO

IPL 2022 : लखनऊची 'प्ले ऑफ' मध्ये एन्ट्री, गौतम गंभीरनं केलं जबरदस्त सेलिब्रेशन! VIDEO

शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात लखनऊनं विजय मिळवताच टीमचा मेंटॉर गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) आनंदाला पारावार उरला नाही.

शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात लखनऊनं विजय मिळवताच टीमचा मेंटॉर गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) आनंदाला पारावार उरला नाही.

शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात लखनऊनं विजय मिळवताच टीमचा मेंटॉर गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) आनंदाला पारावार उरला नाही.

  मुंबई, 19 मे : लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) पहिल्याच आयपीएल सिझनमध्ये 'प्ले ऑफ' मध्ये धडक मारली आहे. नवी मुंबईत बुधवारी झालेल्या स्पर्धेतील 66 व्या सामन्यांत लखनऊनं कोलकाता नाईट रायडर्सचा 2 रननं पराभव केला. या विजयानंतर लखनऊचे 14 मॅचनं 18 पॉईंट्स झाले असून त्यांचा पॉईंट टेबलमध्ये दुसरा क्रमांक आहे. तर केकेआरचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात लखनऊनं विजय मिळवताच टीमचा मेंटॉर गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) आनंदाला पारावार उरला नाही.

  गंभीरनं टीमच्या यशाचा आनंद त्याच्या स्टाईलनं साजरा केला. त्यानं यावेळी लखनऊच्या डग आऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंना मिठी मारली. त्याचे हे सेलिब्रेशन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या मॅचमध्ये कोलकाताला शेवटच्या 2 बॉलमध्ये 3 रनची आवश्यकता होती. त्यावेळी मार्कस स्टॉयनिसनं सलग दोन विकेट्स घेत लखनऊच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

  या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांनी 20 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 210 रन केल्या. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने एकही विकेट गमावली नाही. क्विंटन डिकॉकने (Quinton De Kock Century) वादळी शतक झळकावलं. डिकॉकने 70 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 140 रन केले. त्याच्या या खेळीमध्ये 10 फोर आणि 10 सिक्सचा समावेश होता, तसंच केएल राहुलने (KL Rahul) 51 बॉलमध्ये नाबाद 68 रनची खेळी केली.

  IPL 2022 : एकच चूक तीनदा केली, KKR नं निर्णायक मॅच गमावली!

  केकेआरकडून रिंकू सिंगने 15 बॉलमध्ये 40 रनची वादळी खेळी केली, यात 2 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर सुनिल नारायण 7 बॉलमध्ये 21 रनवर नाबाद राहिला. कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 29 बॉलमध्ये 50 रनची खेळी केली.

  First published:

  Tags: Gautam gambhir, Ipl 2022, KKR, Lucknow Super Giants