मुंबई, 9 डिसेंबर : टीम इंडियाच्या वन-डे टीमच्या कॅप्टनपदी रोहित शर्माची (Rohit Sharma) नियुक्ती करण्यात आली आहे. विराट कोहली ही कॅप्टनसी सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे बीसीसीआयनला त्याची या पदावरून हकालपट्टी करावी लागली. आता विराट फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. तर लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधील दोन्ही टीमचं नेतृत्त्व रोहितकडे देण्यात आले आहे. रोहितनंतर टीम इंडियाचा बॅटर केएल राहुल (KL Rahul) याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. ‘इनसाईड स्पोर्ट्स’ च्या वृत्तानुसार राहुलला वन-़डे टीमचा व्हाईस कॅप्टन बनवण्यात येणार आहे. त्याला न्यूझीलंड विरुद्ध मागील महिन्यात झालेल्या टी20 सीरिजपूर्वी त्या टीमचा व्हाईस कॅप्टन करण्यात आले होते. ‘राहुलने गेल्या काही वर्षात जोरदार खेळ केला आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे आणथी 6-7 वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे भविष्यात कॅप्टन होण्याची त्याला संधी आहे. टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडसह (Rahul Dravid) रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून त्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे, ’ अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन-डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा अद्याप झालेली नाही. या टीमच्या निवडीच्या वेळी राहुलच्या नव्या जबाबदारीची अधिकृत घोषणा होऊ शकते. राहुलने गेल्या दोन वर्षातील वन-डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन केले आहेत. या कालावधीत त्यानं 12 इनिंगमध्ये 62 च्या सरासरीनं 620 रन केले आहेत. यामध्ये 2 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. राहुलने या कालाधीत दर 2 इनिंगमध्ये 50 पेक्षा जास्त रन केले आहेत. VIDEO : बेन स्टोक्सनं 30 बॉलमध्ये 14 वेळा टाकले NO BALL, अंपायरला दिसलेच नाहीत! आयपीएलमध्येही कमाल राहुल आयपीएल (IPL) स्पर्धेतही सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यानं गेल्या चार सिझनमध्ये प्रत्येक वेळी 500 पेक्षा जास्त रन काढले आहेत. त्याने आयपीएल 2021 मधील (IPL 2021) 13 मॅचमध्ये 63 च्या सरासरीनं 626 रन काढले. यामध्ये 6 अर्धशतकांचा समावेश होता. तसंच त्याचा स्पर्धेतील स्ट्राईक रेट 139 होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.