ब्रिस्बेन, 5 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिली टेस्ट ब्रिस्बेनमध्ये सुरू आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी नवा वाद सुरू झाला आहे. या टेस्टमध्ये इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं (Ben Stokes) पाच ओव्हर्समध्ये तब्बल 14 वेळा नो बॉल टाकले. पण, यामधील 12 वेळा अंपायरला ते दिसलेच नाहीत. बॉलरनी नो बॉल टाकला की नाही हे तपासण्याचे काम आता थर्ड अंपायरकडे आहे. या टेस्टचे थर्ड अंपायर पॉल विल्सन यांनी तब्बल 12 नो बॉल दिले नाहीत, असा दावा ऑस्ट्रेलियातील खासगी क्रीडा वाहिनीने केला आहे. त्यामुळे वाद सुरू झाला आहे. वॉर्नरला जीवदान ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमधील 13 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. इंग्लंडकडून बेन स्टोक्स (Ben Stokes) ही ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर स्टोक्सने वॉर्नरला क्लीन बोल्ड केले. पण तो बॉल नो बॉल असलल्याचा निर्णय थर्ड अंपायरनं दिला. स्टोक्सच्या या चुकीमुळे वॉर्नरला जीवदान मिळाले. वॉर्नर त्यावेळी फक्त 17 रनवर खेळत होता. बेन स्टोक्सनं या ओव्हरमध्ये वॉर्नरची दांडी उडवण्यापूर्वी तीन वेळा नो बॉल टाकला होता. पण, थर्ड अंपायरला ते लक्षात आले नाही. स्टोक्सनं त्या ओव्हरमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर नो बॉल टाकला. पण, थर्ड अंपायरनं फक्त चौथा बॉल तपासला. कारण, त्या बॉलवर वॉर्नर आऊट झाला होता. 6, 6, 6, 6, 6! 23 वर्षांच्या बॅटरने लगावले सलग 5 SIX, वाचा सहाव्या बॉलवर काय झालं… 14 NO BALL ऑस्ट्रेलियात अॅशेस सीरिजचे प्रसारण करणाऱ्या ‘चॅनेल 7 ने केलेल्या गौप्यस्फोटानुसार बेन स्टोक्सनं गुरूवारी 14 वेळा नो बॉल टाकला असा गौप्यस्फोट केला आहे. त्यापैकी फक्त 2 वेळा थर्ड अंपायरने नो बॉल दिले. थर्ड अंपायरने असं का केलं याचं कारणही आता उघड झालं आहे.
The technology for the TV umpire to call no-balls live isn't working at the Gabba.
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 9, 2021
Ben Stokes overstepped 𝟭𝟰 times in the first session - just one was called on-field, plus one on review 👀
(via @7Cricket) #Ashes pic.twitter.com/rn4HOAboqi
ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर थर्ड अंपायरला नो बॉल देण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान नाही. त्यामुळे थर्ड अंपायरला प्रत्ये बॉलचा रिप्ले पाहणे शक्य नाही. त्यामुळे आता मैदानातील अंपायर्सनाच नो बॉलचा निर्णय द्यावा लागणार आहे.