जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / रोहित शर्माची डोकेदुखी वाढली, टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर ठरतोय फेल

रोहित शर्माची डोकेदुखी वाढली, टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर ठरतोय फेल

रोहित शर्माची डोकेदुखी वाढली, टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर ठरतोय फेल

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅचविनर फेल ठरत असल्यानं कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) काळजीत भर पडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये सीएसकेकडून (CSK) 23 रननं पराभव झाला. आरसीबीचा या स्पर्धेतील तिसरा पराभव आहे. सीएकेनं दिलेलं 217 रनचं आव्हान आरसीबीला पूर्ण करता आलं नाही. त्यांनी 9 आऊट 193 रन केले. आरसीबीला मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना माजी कॅप्टन विराट कोहलीकडून (Virat Kohli) मोठी  अपेक्षा होती. पण, विराटनं साफ निराशा केली. तो फक्त 1 रन करून नवोदीत मुकेश चौधरीच्या बॉलिंगवर आऊट झाला. विराट कोहली यापूर्वी केकेआर विरूद्ध 12 तर राजस्थान रॉयल्स विरूद्ध फक्त 5 रन काढून आऊट झाला होती. त्यानं मुंबई इंडियन्स विरूद्ध 48 आणि पंजाब किंग्ज विरूद्ध 41 रनची खेळी केली होती. विराटनं 5 इनिंगमध्ये 107 रन केले असून तीनवेळा त्याला 20 पेक्षा जास्त रन करता आलेले नाहीत. विराट कोहली मागील आयपीएल सिझनमध्येही खास कमाल करू शकला नव्हता. त्यानं 15 मॅचमध्ये 29 च्या सरासरीनं 405 रन केले होते. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश होता. तसंच त्याचा स्ट्राईक रेट 119 होता. हा विराट कोहलीचा तीन सिझनमधील सर्वात कमी स्कोर होता. यापूर्वी 2017 साली त्यानं 308 रन केले होते. एका सिझनमध्ये सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्डही विराट कोहलीच्या नावावर आहे. त्यानं आयपीएल 2016 मध्ये 81 च्या सरासरीनं 973 रन केले होते. त्यानंतर एकाही सिझनमध्ये विराटनं 600 रन केलेले नाहीत. IPL 2022 : रिकी पॉन्टिंगची अजब तऱ्हा, मुंबईकरचा आधी केला अपमान नंतर केलं अभिनंदन! विराट फक्त आयपीएलमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरतोय. त्यानं आंतरराष्ट्रीय शतक झळकावून आता दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. श्रीलंका विरूद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही त्याला शतक झळकावण्यात अपयश आले. यापूर्वी टी20 मालिकेतही तो मोठी खेळी करू शकला नव्हता. टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर असलेल्या विराटनं बॅटींगवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी टीम इंडियाच्या दोन प्रकारातील आणि आरसीबी टीमची कॅप्टनसी सोडली. त्यानंतरही त्याच्या खेळात सुधारणा झालेली नाही. आगामी टी20 वर्ल्ड कपचा विचार करता विराटचा हा फॉर्म रोहित शर्माची काळजी वाढवणारा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात