मुंबई, 13 एप्रिल : आयपीएल 2022 मधील रविवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा (DC vs KKR) 44 रननं पराभव केला. या मॅचमध्ये दिल्लीनं घेतलेल्या एका निर्णयाचा सर्वांना धक्का बसला. केकेआरविरूद्ध दिल्लीच्या 5 विकेट्स गेल्यानंतरही सरफराज खानला (Sarfaraz Khan) बॅटींगची संधी मिळाली नाही. यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये सरफराजनं पाचव्या क्रमांकावर येत कॅप्टन ऋषभ पंतसोबत चांगली पार्टनरशिप केली होती. सरफराजनं त्या मॅचमध्ये 28 बॉलमध्ये नाबाद 36 रन केले. त्यानंतरही केकेआरनं त्याला बॅटींगची संधी दिली नाही. दिल्लीने अक्षर पटेलला (Axar Patel) सहाव्या तर शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) सातव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं. अक्षर आणि शार्दुल हे दोघं ऑलराऊंडर आहेत, तर सरफराज बॅटर आहे, तरीही त्याला बॅटिंगची संधी देण्यात आली नाही. . शार्दुल ठाकूरने 11 बॉलमध्ये नाबाद 29 तर अक्षर पटेलने 14 बॉलमध्ये नाबाद 22 रन केले, त्यामुळे दिल्लीचा अक्षर आणि शार्दुललाा पुढे पाठवण्याचा निर्णय त्या दिवशी योग्य ठरला. या संपूर्ण प्रकरणावर दिल्लीचा हेड कोच रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यानं स्पष्टीकरण दिलं आहे.
केकेआर विरूद्धच्या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या यू ट्यूब व्हिडीओमध्ये पॉन्टिंग म्हणाला की, ‘मी एका खेळाडूचं अभिनंदन करणार आहे, तो खेळाडू सरफराज खान आहे. मी सरफाराजला मागच्या आठवड्यात तीन नंबरवर बॅटींग करायला मिळेल, असं सांगितलं होतं. टीम शीटवरही त्याचं नाव तीन नंबरवर होतं. पण,मॅचमधील परिस्थिती बदलत गेली आणि त्याला बॅटींगची संधी मिळाली नाही. IPL 2022 : 36 वर्षांच्या खेळाडूनं घेतला एका हातानं थरारक कॅच, VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका त्यानं ही गोष्ट आता विसरली पाहिजे. या गोष्टी टीमचा भाग आहेत. अखेर विजय महत्त्वाचा असतो. मला आनंद आहे की, तू या प्रोसेसचा भाग बनलास. एके दिवशी तुझाही नंबर येईल. तुला संधी मिळेल, त्यामुळे यावर जास्त विचार करण्याची गरज नाही, असं पॉन्टिंगनं यावेळी स्पष्ट केलं.