Home /News /sport /

IPL 2022 : आम्हाला जिंकणे शक्य होते, पण... सलग दुसऱ्या पराभवानंतर राहुलची नाराजी उघड

IPL 2022 : आम्हाला जिंकणे शक्य होते, पण... सलग दुसऱ्या पराभवानंतर राहुलची नाराजी उघड

LSG vs RR: आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी करत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे. या पराभवानंतर कॅप्टन केएल राहुलची (KL Rahul) नाराजी उघड झाली आहे.

    मुंबई, 16 मे : आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी करत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे. राजस्थान रॉयल्सनं रविवारी त्यांचा 24 रननं पराभव केला. या पराभवानंतर लखनऊची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. राजस्थाननं पहिल्यांदा बॅटींग करत 179 रनचं लक्ष्य दिलं होतं. लखनऊला ते लक्ष्य पूर्ण करता आले नाही. लखनऊनं 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 154 रन केले. या पराभवानंतर लखनऊचा कॅप्टन केएल राहुलला (KL Rahul) नाराजी लपवता आली नाही. राहुलनं मॅचनंतर सांगितलं की, 'हे लक्ष्य पूर्ण करणे शक्य होते. पिच चांगले होते. आम्ही त्यांना या स्कोरवर रोखले होते. आमच्या बॅटींगनं पुन्हा एकदा निराशा केली. बॅटर्सनी एकत्र येऊन खेळ केला नाही. आम्ही आमच्या रणनितीनुसार खेळण्यात अयशस्वी ठरलो. आम्हाला पुढच्या मॅचमध्ये चांगला खेळ खेळावा लागेल.' कॅप्टन राहुल देखील राजस्थान विरूद्ध अपयशी ठरला. त्याने 19 बॉलमध्ये 10 रन केले. यापूर्वी गुजरात विरूद्धही राहुलनं 16 बॉलमध्ये 8 रन केले होते. त्यापूर्वी केकेआर विरूद्ध तर तो शून्यावर आऊट झाला होता. राहुलचा ओपनिंगचा पार्टनर क्विंटन डी कॉकही सलग दुसऱ्या मॅचमध्ये अपयशी ठरला. लखनऊकडून दिपक हुड्डानं पुन्हा एकदा चांगली बॅटींग केली. त्यानं या सिझनमधील चौथे अर्धशतक झळकावले.पण, त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. लखनऊचा हा 13 सामन्यांमधील पाचवा पराभव आहे. त्यांचा शेवटचा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध होणार असून टॉप 2 मधील आव्हान कायम ठेवण्यासाठी त्यांना  तो सामना जिंकणे आवश्यक आहे. IPL 2022 : बटलर-परागची कमाल, SIX चे केले OUT मध्ये रूपांतर, पाहा VIDEO राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) याने या विजयानंतर समाधान व्यक्त केले. 'हा विजय आनंद देणारा आहे. आम्ही चांगला स्कोर केला. त्यानंतर बॉलर्सनी त्यांचं काम केलं. आमच्या स्पिनर्सनी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे,' असे संजूने सांगितले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Kl rahul, Lucknow Super Giants, Rajasthan Royals

    पुढील बातम्या