Home /News /sport /

IPL 2022 : बटलर-परागची कमाल, SIX चे केले OUT मध्ये रूपांतर, पाहा VIDEO

IPL 2022 : बटलर-परागची कमाल, SIX चे केले OUT मध्ये रूपांतर, पाहा VIDEO

राजस्थान रॉयल्सचे 16 पॉईंट्स झाले असून त्यांनी 'प्ले ऑफ' च्या दिशेनं दमदार पाऊल टाकले आहे. राजस्थानच्या या विजयात त्यांच्या दमदार फिल्डिंगचाही वाटा होता.

    मुंबई, 16 मे : राजस्थान रॉयल्सनं रविवारी  महत्त्वाच्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सवर (RR vs LSG) 24 रननं विजय मिळवला. या विजयासह राजस्थानचे आता 16 पॉईंट्स झाले असून त्यांनी 'प्ले ऑफ' च्या दिशेनं दमदार पाऊल टाकले आहे. राजस्थानच्या या विजयात त्यांच्या दमदार फिल्डिंगचाही वाटा होता. जोस बटलर (Jos Buttler) आणि रियान पराग (Riyan Parag) या जोडीनं एकत्रितपणे फिल्डिंग करत सिक्स जाणाऱ्या बॉलचे आऊटमध्ये रूपांतर केले. लखनऊच्या इनिंगमधील 13 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर हा प्रसंग घडला. राजस्थानकडून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ती ओव्हर टाकत होता. त्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर कृणाल पांड्यानं (Krunal Pandya) लाँग ऑफच्या दिशेनं फटका मारला. त्या भागात फिल्डिंग करत असलेल्या बटलरनं तो कॅच पकडला. पण, त्याचवेळी आपण आता बांऊड्री लाईनच्या पलिकडं जात असल्याची जाणीव त्याला झाली. त्यावेळी बटलरनं तो बॉल तातडीनं जवळ उभ्या असलेल्या परागच्या दिशेनं फेकला. परागनं कोणतीही चूक न करता तो कॅच पकडला आणि कृणालला परत पाठवलं. राजस्थाननं या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 178 रन केले होते. लखनऊला त्याला उत्तर देताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 154 रनच करता आले. लखनऊकडून दीपक हुड्डानं सर्वाधिक 59 रन केले. हुड्डा आणि कृणाल जोडीनं चौथ्या विकेटसाठी 65 रनची भागिदारी करत लखनऊच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. बटलर-पराग जोडीनं जबरदस्त कॅच घेत लखनऊला मोठा धक्का दिला. IPL 2022 : धोनीनं मान्य केली चूक, गुजरात विरूद्धच्या पराभवाचं सांगितलं कारण लखनऊ आणि राजस्थान या दोन्ही टीमनी आता 13 पैकी 8-8 सामने जिंकले आहेत. या विजयानंतर राजस्थानची टीम दुसऱ्या क्रमांकावर आली असून लखनऊची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. लखनऊची शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी तर राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. टॉप 2 मध्ये राहण्यासाठी त्यांना हे सामने जिंकणे आवश्यक आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Lucknow Super Giants, Rajasthan Royals

    पुढील बातम्या