मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : गुजरात टायटन्सचा पहिला नंबर निश्चित, 5 टीमच्या आशा संपुष्टात

IPL 2022 : गुजरात टायटन्सचा पहिला नंबर निश्चित, 5 टीमच्या आशा संपुष्टात

हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आयपीएल 2022च्या पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 राहणार हे निश्चित झालं आहे. आता उर्वरित 3 जागांसाठी 4 टीममध्ये चुरस आहे.

हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आयपीएल 2022च्या पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 राहणार हे निश्चित झालं आहे. आता उर्वरित 3 जागांसाठी 4 टीममध्ये चुरस आहे.

हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आयपीएल 2022च्या पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 राहणार हे निश्चित झालं आहे. आता उर्वरित 3 जागांसाठी 4 टीममध्ये चुरस आहे.

    मुंबई, 16 मे : हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आयपीएल 2022च्या पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 राहणार हे निश्चित झालं आहे. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं लखनऊ सुपर जायंट्सचा (RR vs LSG) 24 रननं पराभव केला. त्यामुळे आता गुजरातसोडून अन्य कोणतीही टीम 20 पॉईंट्स पर्यंत जाणार नाहीत.. गुजरातनं 13 पैकी 10 सामने जिंकले असून त्यांचे 20 पॉईंट्स आहेत. राजस्थान आणि लखनऊचे 13 सामन्यांनतर प्रत्येकी 16 पॉईंट्स आहेत. या आयपीएल सिझनमधून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन टीम बाहेर पडल्या आहेत. 3 टीमचे 16 किंवा त्यापेक्षा जास्त पॉईंट्स आहेत. पंजाब किंग्ज विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात सोमवारी सामना होत आहे. हा सामना हरणारी टीम 16 पॉईंट्स पर्यंत पोहचणार नाही. त्यामुळे आरसीबीनं 19 मे रोजी होणाऱ्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत केले तर अन्य 5 टीमची 'प्ले ऑफ' गाठण्याची आशा संपुष्टात येईल. दिल्ली आणि पंजाबचे आणखी 2 सामने बाकी आहेत. यापैकी कोणत्याही टीमनं हे 2 सामने जिंकले तर त्यांचे 16 पॉईंट्स होतील. त्यांची लखनऊ आणि आरसीबीशी चुरस असेल. पंजाबचा शेवटचा सामना हैदराबादशी तर दिल्लीचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध होणार आहे. आरसीबीनं त्यांचा शेवटचा सामना हरला तर त्यांची टीमही 16 पर्यंत पोहचू शकणार नाही.  त्या परिस्थितीमध्ये राजस्थान आणि लखनऊची टीम शेवटचा सामना हरली तरी 'प्ले ऑफ' मध्ये जाईल. आरसीबी शेवटचा सामना हरली तर 14 पॉईंट्सवाली टीम देखील 'प्ले ऑफ' मध्ये पोहचू शकेल. त्या परिस्थितीमध्ये रनरेट महत्त्वाचा ठरेल. आरसीबीचा रनरेट मायनसमध्ये आहे. तो पराभवानंतर आणखी कमी होईल. त्यामुळे गुजरात विरूद्ध पराभूत झाल्यास त्यांचं आव्हान संपुष्टात येईल. लखनऊचा शेवटचा सामना केकेआरशी होणार आहे. राजस्थान आणि लखनऊ या दोन्ही टीम शेवटचा सामना जिंकून टॉप 2 मध्ये जाण्याचा प्रयत्न करतील. IPL 2022, LSG vs RR : राजस्थानचं प्ले ऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल! दीपक हुडाची एकाकी झुंज अपयशी लीग राऊंडमधील आता फक्त 7 सामने बाकी आहेत. यंदा 10 टीम असल्यानं एकून 70 सामने आहेत. लीगमधील शेवटचा सामना 22 मे रोजी आहे.नॉक आऊट सामने 24 मे पासून सुरू होतील. फायनल 29 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. यावर्षी नवी टीम आयपीएल स्पर्धा जिंकेल अशी आशा आहे. यापूर्वी 2016 साली नवी टीम आयपीएल चॅम्पियन बनली होती. त्यावर्षी सनरायझर्स हैदराबादनं विजेतेपद पटकावले होते. एका आयपीएल सिझनमध्ये पहिल्यांदाच मुंबई आणि चेन्नई या दोन्ही टीमनं 9-9 सामने गमावले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Lucknow Super Giants

    पुढील बातम्या