मुंबई, 15 मे : राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) टॉप-2 मध्ये येण्याच्या आशा अबाधित ठेवल्या आहेत. आयपीएल 2022 च्या 63 व्या सामन्यात संघाने लखनौ सुपर जायंट्सचा 24 धावांनी पराभव केला. संघाचा 13 सामन्यांमधला हा 8वा विजय आहे. लखनौनेही आतापर्यंत 13 पैकी 8 सामने जिंकले आहेत. अंतिम सामन्यानंतर क्रमांक-2 संघ निश्चित होईल. हे यासाठी महत्त्वाचे आहे, कारण नंबर-2 संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 2 संधी मिळतात. या सामन्यात प्रथम खेळताना राजस्थानने 6 बाद 178 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 41 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 8 बाद 154 धावाच करू शकला. लखनौचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर तर राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आला आहे. गुजरात टायटन्स संघ 20 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने क्विंटन डी कॉकला बाद केले. त्याने 8 चेंडूत 7 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर बोल्टने आयुष बडोनीला एलबीडब्ल्यू करून संघाला दुसरे यश मिळवून दिले. वाढत्या धावगतीचा दबाव कर्णधार केएल राहुलवरही दिसून आला. तो 19 चेंडूत 10 धावा करून प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर बाद झाला. संघासाठी हा मोठा धक्का होता. पांड्या आणि हुड्डा यांनी धुरा सांभाळली 29 धावांवर 3 विकेट पडल्यानंतर कृणाल पांड्या आणि दीपक हुडा यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 65 धावा जोडल्या. पांड्या 23 चेंडूत 25 धावा करून आर अश्विनच्या चेंडूवर बाद झाला. जोस बटलर आणि रायन पराग यांनी मिळून लाँग बाऊंड्रीवर त्याचा शानदार झेल टिपला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. संघाच्या 100 धावा 15 व्या षटकात पूर्ण झाल्या. शेवटच्या 5 षटकात संघाला विजयासाठी 72 धावा करायच्या होत्या आणि 6 विकेट्स शिल्लक होत्या.
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये कर्णधारपदाच्या युक्त्या शिकल्या का? स्वतःच केला खुलासा
दीपक हुडाचे चौथे अर्धशतक दरम्यान, दीपक हुडाने 33 चेंडूत अर्धशतक केले. यात त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचे हे मोसमातील चौथे अर्धशतक आहे. 16व्या षटकात लेगस्पिनर युजवेंद्र चहलने संघाला मोठे यश मिळवून दिले. हुड्डा 59 धावा करून यष्टिचित झाला. 17व्या षटकात मॅककॉयच्या चेंडूवर होल्डर एक धाव घेत बाद झाला. संघाला सहावा धक्का बसला. मॅकॉयनेही शेवटच्या चेंडूवर चमीराला बाद केले. आता लखनौला 18 चेंडूत 59 धावा करायच्या होत्या आणि मार्कस स्टेनिस क्रीजवर होता. चहलने 10 धावा दिल्या चहलने 18 वे षटक टाकले आणि 10 धावा दिल्या. शेवटच्या चेंडूवर स्टेनिसने षटकार ठोकला. मॅकॉयने 19 वे षटक टाकले. त्याने 15 धावा दिल्या. आता शेवटच्या षटकात 34 धावा करायच्या होत्या. कृष्णाच्या पहिल्या चेंडूवर स्टेनिसने षटकार ठोकला, पण दुसऱ्या चेंडूवर तो 27 धावांवर बाद झाला. मोहसीन खान नाबाद 9 आणि आवेश खानने एक धाव काढली. IPL 2022: धोनी म्हणाला, मिळाला दुसरा मलिंगा; आयपीएलच्या पहिल्या चेंडूवर घेतली विकेट! पहा VIDEO तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम खेळण्याचा निर्णय घेतलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. उत्कृष्ट फॉर्मात असलेला जोस बटलर अवघ्या 2 धावा करून आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने आतापर्यंत 3 शतके झळकावली आहेत. मात्र, यानंतर यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसनने संघाची धुरा सांभाळली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. सॅमसनने 24 चेंडूत 32 धावा केल्या आणि त्याला जेसन होल्डरने बाद केले. त्याने 6 चौकार मारले. संघाच्या 100 धावा 11 व्या षटकात पूर्ण झाल्या. 11 षटकांनंतर 2 बाद 101 धावा झाल्या. आक्रमक खेळी खेळून पडिक्कल बाद चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या देवदत्त पडिक्कलने आक्रमक खेळी केली. त्याने 18 चेंडूत 217 च्या स्ट्राईक रेटने 39 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 2 षटकाराचा समावेश आहे. त्याला रवी बिश्नोईने बाद केले. यानंतर यशस्वीने 28 चेंडूत 41 धावा केल्या. त्याला आयुष बडोनीने बाद केले. त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. 15 षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या 4 बाद 130 अशी होती. ‘इतिहास रचला…’ थॉमस कप बॅडमिंटनमध्ये ऐतिहासिक विजयाने भारतात आनंदाची लाट एका ओव्हरमध्ये 2 झकटे रवी बिश्नोईने 16व्या षटकात केवळ 7 धावा दिल्या. 17व्या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खानने 12 धावा दिल्या. रायन परागने या षटकात षटकार ठोकला. राजस्थानने 18व्या षटकात 2 मोठ्या विकेट्स गमावल्या. रायन पराग पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने 16 चेंडूत 19 धावा केल्या. त्यानंतर नीशम चौथ्या चेंडूवर 14 धावा काढून धावबाद झाला. त्याने 12 चेंडूंचा सामना केला आणि 2 चौकार मारले. अशा प्रकारे स्कोअर 6 विकेटवर 152 धावा झाला. राजस्थानने शेवटच्या 2 षटकात 24 धावा केल्या. 19व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर ट्रेंट बोल्टने मोहसीनवर दोन चौकार ठोकले. षटकात 14 धावा झाल्या. आवेश खानने शेवटचे षटक टाकले. त्याने 10 धावा दिल्या. बोल्ट 9 चेंडूत 17 धावा करून नाबाद राहिला आणि अश्विनने 7 चेंडूत 10 धावा केल्या.