मुंबई, 24 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये आजवर सर्व मॅच हरणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) चांगल्या कामगिरी करण्याची प्रेरणा घेण्यासाठी आज चांगला दिवस आहे. मास्टर ब्लास्टर आणि मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) आज (24 एप्रिल) वाढदिवस आहे. आजच्या दिवशी लखनऊ सुपर जायंट्स विरूद्धचा सामना जिंकून (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्स सचिनला वाढदिवसाचं गिफ्ट देणार का? हा खरा प्रश्न आहे. मुंबईनं आत्तापर्यंत सर्व सात सामने गमावले आहेत. आता आणखी एका पराभवानंतर त्यांच्या ‘प्ले ऑफ’ च्या उर्वरित आशा देखील संपुष्टात येऊ शकतात. तर लखनऊची टीम पॉईंट टेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर आहे. लखनऊनं 7 पैकी 4 सामने जिंकले असून 3 सामन्यांमध्ये पराभव सहन केला आहे. या दोन्ही टीमच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात लखनऊनं मुंबईचा 18 रननं पराभव केला होता. मुंबईची रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) ही जोडी सध्या फॉर्मात नाहीय. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध तर ते दोघंही शून्यावर आऊट झाले होते. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मानं चांगली कामगिरी केली आहे. त्यांना रोहित-इशानची साथ मिळाली तर मुंबईची बॅटींग भक्कम होईल. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध डॅनियल सॅम्सनं 4 विकेट्स घेत दमदार पुनरागमन केलं होतं. लखनऊ विरूद्धही त्याच्याकडून याच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असेल. जयदेव उनाडकतला महेंद्रसिंह धोनीनं शेवटच्या ओव्हरमध्ये केलेली धुलाई विसरून नव्या जोमानं मैदानात उतरावं लागेल. लखनऊचा कॅप्टन केएल राहुल चांगल्या फॉर्मात आहे. त्याला क्विंटन डी कॉकची ओपनिंगला साथ मिळतीय. दीपक हुडा आणि आयुष बदोनीला पुन्हा एकदा चांगली खेळी करण्याची गरज आहे. जेसन होल्डर आणि मार्कस स्टॉईनिस हे दोन ऑलराऊंडर लखनऊकडे आहेत. तर आवेश खान आणि रवी बिश्नोई या तरूण बॉलर्सवर लखनऊच्या बॉलिंगची भिस्त आहे. IPL 2022 दरम्यान धोनीच्या घरी आल्या 2000 कडकनाथ कोंबड्या, वाचा काय आहेत फायदे! मुंबई इंडियन्सची संभाव्य Playing 11 : रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, ऋतिक शौकीन, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकत, जसप्रीत बुमराह, रिले मेरिडीथ लखनऊ सुपर जायंट्सची संभाव्य Playing11 : केएल राहुल, क्विंटन डी कॉक, मनिष पांडे, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, मार्कस स्टॉईनिस, जेसन होल्डर, दुष्मंता चमिरा, आवेश खान, रवी बिश्नोई
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.