मुंबई, 24 एप्रिल : आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) रांचीमधील घरी 2000 कडकनाथ कोंबड्यांचं आगमन झालंय. मध्य प्रदेशातील संस्थेकडं धोनीनं याबाबतची मागणी केली होती. त्यानंतर या सर्व कोंबड्या एका खास वाहनातून रांचीमध्ये रवाना झाल्या आहेत. धोनीचे रांचीमध्ये फार्म हाऊस आहे, त्यामध्ये तो कुक्कुट पालनही करतो. ‘कडकनाथ’ या काळ्या रंगाच्या कडकनाथ कोंबड्या या खास प्रोटिनयुक्त मानल्या जातात. मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील कोंबड्याच्या जातीला मोठ्या कायदेशीर संघर्षांनंतर 2018 साली जीईई टॅग मिळाला आहे. या कोंबड्यांची मांस, अंडी आणि चिकन याची अन्य कोंबड्यापेक्षा जास्त दरानं विक्री केली जाते. झाबूआचे जिल्हाधिकारी सोमेश मिश्रा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘महेंद्रसिंह धोनीनं एका स्थानिक सहकारी संस्थेकडं याबाबतची ऑर्डर दिली होती. त्यानुसार या सर्व कोंबड्या रांचीला रवाना केल्या आहेत. धोनी सारख्या सेलिब्रेटीनं यामध्ये रस दाखवणे ही मोठी गोष्ट आहे. कडकनाथ चिकनची ऑर्डर कुणालाही ऑनलाईन करता येते. त्यामुळे या जिल्ह्यातील आदिवासींचा फायदा होणार आहे. यापूर्वी बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे धोनीनं ऑर्डर दिल्यानंतरही कोंबड्या पाठवल्या नव्हत्या. आता बर्ड फ्लूचा धोका टळल्यानंतर सर्व गोष्टींची खरबदारी घेऊन सर्व कोंबड्या रांचीला पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती झाबूआच्या जिल्हा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख आय.एस. तोमरनं दिली आहे. IPL 2022 : जुनी RCB परतली! मैदानात निघाली लाज, सोशल मीडियावर झाली शाळा काय आहे खासियत? - कडकनाथ जातीचा कोंबडा किंवा कोंबडी यांचा रंग पूर्ण काळा असतो - या कोंबड्यांचे मांस आणि रक्त ही पूर्ण काळे असते - या कोंबड्यांचे मांस आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त समजले जाते - यामध्ये आयर्न आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते - हार्ट आणि डायबेटीजच्या रूग्णांसाठी हे चिकन उपयुक्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.