मुंबई, 17 एप्रिल : लखनऊ सुपर जायंट्सनं रविवारी मुंबई इंडियन्सचा (MI vs LSG) 18 रननं पराभव केला. लखनऊचा हा स्पर्धेतील चौथा विजय आहे. या विजयामध्ये कॅप्टन के.एल. राहुलच्या (KL Rahul) शतकाचा मोठा वाटा होता. राहुलनं 60 बॉलमध्ये नाबाद 103 रनची खेळी केली. राहुलला या विजयाचा आनंद फार काळ घेता आला नाही. त्याला मॅचनंतर 12 लाखांचा आर्थिक दंड आकारण्यात आाला आहे. लखनऊ सुपर जायंट्सनं संथ गतीनं बॉलिंग केल्यानंतर राहुलवर ही कारवाई करण्यात आली. बीसीसीआयनं शनिवारी रात्री याबाबतचे पत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. लखनऊच्या टीमनं ही चूक पहिल्यांदाच केल्यानं त्याच्यावर 12 लाखांची कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलच्या नियमानुसार 85 व्या मिनिटाला 20 वी ओव्हर सुरू होणं बंधनकारक आहे. लखनऊनं ही चूक पुन्हा एकदा केल्यास राहुलवर 24 लाखांचा दंड आकारण्यात येईल. यापूर्वी मुंबई इंडियन्सनं ही चूक दोनदा केल्यानं त्यांचा कॅप्टन रोहित शर्मावर 24 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. केएल राहुलच्या या शतकामुळे लखनऊने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 199 रन केले. मनिष पांडेने 29 बॉलमध्ये 38 तर क्विंटन डिकॉकने 13 बॉलमध्ये 24 रनची खेळी केली. मुंबईकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या. मुरुगन अश्विन आणि फॅबियन एलन यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. IPL 2022 : कार्तिकच्या वादळी खेळीमुळे RCB चा विजय, पॉईंट्स टेबलमध्येही मोठी उडी 200 रनचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 181 रन केले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं सर्वाधिक 37 रन केले. तर डेवाल्ड ब्रेविसनं 31 रन काढले. कायरन पोलार्डनं शेवटच्या ओव्हर्समध्ये 14 बॉलमध्ये 25 रनची खेळी करत मुंबईच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण, पोलार्डलाही निर्णायक विजय मिळवून देण्यात अपयश आले. मुंबई इंडियन्सचा हा सलग सहावा पराभव असून पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या रोहित शर्माच्या टीमवर पहिल्यांदा ही नामुश्की आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







