जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : कार्तिकच्या वादळी खेळीमुळे RCB चा विजय, पॉईंट्स टेबलमध्येही मोठी उडी

IPL 2022 : कार्तिकच्या वादळी खेळीमुळे RCB चा विजय, पॉईंट्स टेबलमध्येही मोठी उडी

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा (RCB vs Delhi Capitals) 16 रननी पराभव केला आहे. आरसीबीने दिलेलं 190 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 173/7 पर्यंतच मजल मारता आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा (RCB vs Delhi Capitals) 16 रननी पराभव केला आहे. आरसीबीने दिलेलं 190 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 173/7 पर्यंतच मजल मारता आली. डेव्हिड वॉर्नरने (David Warner) 38 बॉलमध्ये 66 रन तर ऋषभ पंतने 17 बॉलमध्ये 34 रन केले, तरीही दिल्लीला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. आरसीबीकडून जॉश हेजलवूडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर मोहम्मद सिराजला 2 आणि वानिंदु हसरंगाला 1 विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 189/5 एवढा स्कोअर केला. दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) वादळी खेळीमुळे आरसीबाला या स्कोअरपर्यंत पोहोचता आलं. कार्तिकने 34 बॉलमध्ये नाबाद 66 रन केले, यामध्ये 5 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. कार्तिकने 194.12 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. कार्तिकला शाहबाज अहमदनेही चांगली साथ दिली. अहमद 21 बॉलमध्ये 32 रनवर नाबाद राहिला, त्याने 3 फोर आणि 1 सिक्स मारली. दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांच्यात 52 बॉलमध्ये नाबाद 97 रनची पार्टनरशीप झाली. आयपीएल इतिहासातली ही सहाव्या विकेटसाठीची तिसरी सगळ्यात मोठी पार्टनरशीप आहे. 11.2 ओव्हरनंतर आरसीबीची अवस्था 92/5 अशी होती, पण यानंतर कार्तिक आणि अहमदने दिल्लीच्या बॉलिंगवर आक्रमण केलं आणि त्यांना एकही विकेट मिळवून दिली नाही. दिल्लीचा डावखुरा फास्ट बॉलर मुस्तफिजूरच्या एका ओव्हरमध्ये कार्तिकने तब्बल 28 रन काढले. मॅचची 18वी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या मुस्तफिजूरच्या ओव्हरमध्ये कार्तिकने 4 4 4 6 6 4 अशा एकूण 28 रन ठोकल्या. दिल्लीविरुद्धच्या या विजयासोबतच आरसीबीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आरसीबीने 6 पैकी 4 मॅच जिंकल्या तर 2 मध्ये त्यांचा पराभव झाला, त्यामुळे त्यांच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. दुसरीकडे दिल्लीची टीम 5 मॅचमध्ये 2 विजय आणि 3 पराभवांसह आठव्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात