मुंबई, 10 मे : आयपीएल 2022 मध्ये आज (मंगळवार) होणाऱ्या 57 व्या सामन्यात या सिझनमधील टॉप 2 टीम आमने-सामने आहेत. लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध गुजरात टायटन्स (LSG vs GT) यांच्यात हा सामना होणार आहे.याच सिझनमध्ये पदार्पण करणाऱ्या या टीमनं 11 पैकी 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. रनरेटच्या आधारावर लखनऊची टीम पहिल्या तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजचा सामना जिंकणाऱ्या टीमचा 'प्ले ऑफ' मधील प्रवेश निश्चित होणार आहे. गुजरातनं मागचे दोन सामने गमावले असून लखनऊची टीम मागील चार सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानं फॉर्मात आहे.
लखनऊच्या टीमची बॅटींग कॅप्टन केएल राहुलवर (KL Rahul) मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. राहुलनं या सिझनमध्ये 2 शतक झळकावली असून सर्वाधिक रन करणाऱ्या बॅटर्सच्या यादीमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही सामन्यांत क्विंटन डी कॉक आणि दीपक हुड्डा यांनीही जबाबदारीनं बॅटींग केल्यानं राहुलवरचा भार हलका झाला आहे. तर गुजरातच्या टीममधून प्रत्येक मॅचमध्ये नवा मॅच विनर समोर आलाय.
गुजरातच्या हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातिया यांना जबाबदारीनं खेळ करावा लागेल. मुंबई विरूद्धच्या मॅचमध्ये हार्दिक आणि तेवातिया रन आऊट झाल्यानं गुजरातचा पराभव झाला होता. गुजरातच्या बॉलिंगची जबाबदारी ही मोहम्मद शमी, राशिद खान आणि लॉकी फर्ग्युसन यांच्यावर आहे. तर लखनऊच्या बॉलिंगची भिस्त ही प्रामुख्यानं आवेश खान आणि रवी बिश्नोई यांच्यावर आहे.
वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियन टीम करणार भारताचा दौरा, वाचा कधी आणि किती होणार सामने
LSG vs GT Dream 11 Team Prediction
कॅप्टन: केएल राहुल
व्हाईस कॅप्टन: शुभमन गिल
विकेट किपर: केएल राहुल
बॅटर: दीपक हुड्डा, शुभमन गिल, साई सुदर्शन
ऑल राऊंडर: जेसन होल्डर, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या
बॉलर: मोहम्मद शमी, आवेश खान, राशिद खान, रवि बिश्नोई
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.