मुंबई, 10 मे : आयपीएल स्पर्धेनंतर (IPL 2022) सर्व टीम यावर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup 2022) तयारी सुरू करणार आहेत. याच तयारीचा भाग म्हणून वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाची टीम सप्टेंबर महिन्यात भारताचा दौरा करणार आहे. दोन्ही देशांमध्ये 3 सामन्यांची टी20 सीरिज होणार आहे. टी20 वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियन टीमचं वेळापत्रक चांगलंच व्यस्त आहे. ऑस्ट्रेलियन टीम ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड विरूद्धच्या वन-डे मालिकेचं यजमानपद भूषविणार आहे. तर भारता विरूद्ध सप्टेंबर महिन्यात टी20 मालिका खेळणार आहे. यावर्षी 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत टी20 वर्ल्ड कप होणार आहे. ऑस्ट्रेलियानं यापूर्वी 2018-19 साली भारताचा दौरा केला होता. त्यावेळी 3 सामन्यांची टी20 सीरिज 1-1 नं ड्रॉ झाली होती. यंदा भारताविरूद्ध टी20 मालिका जिंकण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी ही मालिका दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे. भारताच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम त्यांच्याच देशात वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरूद्ध 3-3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 साली ऑस्ट्रेलियन टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही देशांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत 4 टेस्ट मॅचची मालिका खेळली जाईल. IPL 2022 : श्रेयस अय्यरकडून आपल्याच टीमची ‘पोलखोल’, मॅच जिंकल्यानंतर केला गौप्यस्फोट ऑस्ट्रेलियन टीम यापूर्वी 2017 साली टेस्ट सीरिज खेळण्यासाठी भारतामध्ये आली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला ती मालिका गमावावी लागली होती. यापूर्वी 2013 साली देखील भारताने ऑस्ट्रेलियावर क्लीन स्वीप मिळवला होता. ऑस्ट्रेलियानं 2004-05 साली शेवटती भारतामध्ये टेस्ट सीरिज जिंकली होती. आता पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखालील ऑस्ट्रेलियन टीमचा हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.