Home /News /sport /

IPL 2022 : KL राहुलची कमाल, 7 फुट उंचीवर पकडला जिवलग मित्राचा कॅच! VIDEO

IPL 2022 : KL राहुलची कमाल, 7 फुट उंचीवर पकडला जिवलग मित्राचा कॅच! VIDEO

जोरदार फटकेबाजी करणाऱ्या मयंकला आऊट करणे लखनऊसाठी (Lucknow Super Giants) आवश्यक होते. त्यावेळी त्यांचा कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) पुढाकार घेतला.

    मुंबई, 30 एप्रिल : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 42 व्या मॅचमध्ये पंजाब किंग्जला (Punjab Kings) विजयासाठी 154 रनची आवश्यकता होती. पंजाबचा कॅप्टन मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यानं या टार्गेटचा पाठलाग करताना वेगानं सुरूवात केली. जोरदार फटकेबाजी करणाऱ्या मयंकला आऊट करणे लखनऊसाठी (Lucknow Super Giants) आवश्यक होते. त्यावेळी त्यांचा कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) पुढाकार घेतला. त्यानं मयंकचा अफलातून कॅच पकडला. मयंक आणि राहुल हे दोघंही जिवलग मित्र आहेत. ते कर्नाटककडून एकत्र क्रिकेट खेळतात. त्यानंतर पंजाब किंग्जकडूनही ते आयपीएलमध्ये एकत्र खेळले आहेत. या आयपीएलपूर्वी राहुलनं पंजाबची टीम सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राहुल लखनऊचा तर मयंक पंजाबचा कॅप्टन झाला. शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये हे जिवलग मित्र पहिल्यांदाच एकमेकांच्या विरूद्ध खेळत होते. केएल राहुलला बॅटींगमध्ये फार कमाल करता आली नाही. तो फक्त 6 रन काढून कागिसो रबाडाच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्यानं बॅटींगची कमतरता फिल्डिंगमध्ये भरून काढली. पंजाबच्या पाचव्या ओव्हरमध्ये राहुलनं हा कॅच पकडला. दुष्मंथा चमिरानं टाकलेला बॉल मयंकनं मिड ऑफला मारला होता. यावेळी राहुलनं जबरदस्त फिटनेसचं उदाहरण दिलं. राहुलनं जवळपास 7 फुट उंचीवर तो कॅच पकडला. मयंकनं 17 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 25 रन केले. मयंत आऊट झाल्यानंतर पंजाबची गळती सुरू झाली. त्यांच्या विकेट्स ठराविक अंतरानं पडल्या. पंजाबला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 133 रनपर्यंतच मजल मारता आली. लखनऊकडून फास्ट बॉलर मोहसीन खाननं 24 रन देत 3 विकेट्स घेतल्या. तर दुश्मंथा चमिरानं 17 रन देत 2 विकेट्स घेतल्या. कृणाल पांड्यालाही 2 विकेट्स मिळाल्या. तर रवी बिश्नोईनं 1 विकेट घेतली. पंजाबकडून जॉनी बेअरस्टोनं सर्वाधिक 32 रन केले. IPL 2022 : मुंबई इंडियन्सनं 4 वर्ष केलं दुर्लक्ष, लखनऊनं संधी देताच झाला हिरो लखनऊचा हा नऊ मॅचमधील सहावा विजय आहे. या विजयासह त्यांचे 12 पॉईंट्स झाले असून पॉईंट टेबलमध्ये लखनऊची टीम आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल स्पर्धेच्या 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी त्यांना आता आणखी दोन विजयांची आवश्यकता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Kl rahul, Lucknow Super Giants, Punjab kings

    पुढील बातम्या