Home /News /sport /

IPL 2022 : मुंबई इंडियन्सनं 4 वर्ष केलं दुर्लक्ष, लखनऊनं संधी देताच झाला हिरो

IPL 2022 : मुंबई इंडियन्सनं 4 वर्ष केलं दुर्लक्ष, लखनऊनं संधी देताच झाला हिरो

LSG vs PBSK: लखऊन सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये 153 रनचं यशस्वी संरक्षण करत पंजाब किंग्जचा (Punjab Kings) 20 रननं पराभव केला. या विजयात 23 वर्षांच्या फास्ट बॉलरचा मोठा वाटा होता.

    मुंबई, 30 एप्रिल : लखऊन सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये 153 रनचं यशस्वी संरक्षण करत पंजाब किंग्जचा (Punjab Kings) 20 रननं पराभव केला. लखऊनच्या या विजयात 23 वर्षांचा उत्तर प्रदेशचा फास्ट बॉलर मोहसीन खानचा (Mohsin Khan) महत्त्वाचा वाटा होता. मोहसीननं 4 ओव्हर्समध्ये 24 रन देत 3 विकेट्स घेतल्या. लखनऊ सुपर जायंट्सच्या मोहसीनला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी सहज मिळलेली नाही.मोहसीननं 2018 साली उत्तर प्रदेशकडून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच वर्षी त्यानं विजय हजारे ट्रॉफीच्या माध्यमातून लिस्ट A क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. 2018 सालीच झालेल्या आयपीएल लिलावात त्याला मुंबई इंडियन्सनं खरेदी केलं. 2020 मध्येही त्याला पुन्हा एकदा मुंबईनं विकत घेतलं होतं. मुंबई इंडियन्समध्ये चारही वर्ष त्याला बेंचवरच बसावं लागलं.  त्याला या कालावधीमध्ये एकही आयपीएल मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. मोहसीननं 27 टी20 मॅचमध्ये 33, 17 लिस्ट A मॅचमध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. मोहसीनला यावर्षी झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022) लखनऊ सुपर जायंट्सनं 20 लाखांच्या बेस प्राईजला खरेदी केलं. लखनऊनं त्याला आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये खेळण्याची संधी दिली.  गुजरात टायटन्स विरूद्ध झालेली ही मॅच त्याच्यासाठी खास ठरली नाही. त्यानं 2 ओव्हर्समध्ये 18 रन दिले. त्यानंतर तो जवळपास महिनाभर बेंचवर होता. मुंबई इंडियन्स विरूद्ध 24 एप्रिल रोजी झालेल्या मॅचमध्ये आवेश खान फिट नसल्यानं मोहसीनला संधी मिळाली. मोहसीनं त्याच्या जुन्या आयपीएल टीमविरूद्ध 4 ओव्हरमध्ये 24 रन देत 1 विकेट घेतली. IPL 2022 Points Table : पंजाबला पराभूत करत लखनऊ 'प्ले ऑफ' च्या जवळ! मयंकची डोकेदुखी वाढली मुंबई विरूद्धच्या कामगिरीच्या आधारे त्याला पंजाब किंग्ज विरूद्धच्या मॅचमध्ये आणखी एक संधी देण्यात आली. त्यानं या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये 24 रन देत लियाम लिव्हिंगस्टोन, कागिसो रबाडा आणि राहुल चहर यांना आऊट केलं. आयपीएल स्पर्धेतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. लखनऊचा हा नऊ मॅचमधील सहावा विजय असून त्यांची टीम 12 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Ipl 2022, Lucknow Super Giants, Punjab kings

    पुढील बातम्या