मुंबई, 28 मार्च : केएल राहुलच्या (KL Rahul) कॅप्टनसीमध्ये लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आयपीएल स्पर्धेत पदार्पण करण्यास सज्ज आहे. आयपीएलमधील दुसरी नवी टीम गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध लखनौ पहिली मॅच खेळणार आहे. या मॅचपूर्वी लखनऊसोर मोठी डोकेदुखी आहे. कारण, ही टीम त्यांच्या भक्कम प्लेईंग 11 सह मैदानात उतरणार नाही. इंग्लंडचा फास्ट बॉलर मार्क वूड (Mark Wood) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी एंड्रयू टायचा समावेश झाला आहे. तर मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर आणि काईल मेअर्स हे आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यानंतर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण, हे तीन्ही खेळाडू सध्या त्यांच्या नॅशनल टीमसमोबत आहेत. बॅकअपनं सुरूवात लखनऊला पहिल्या मॅचमध्ये बॅकअपनं सुरूवात करावी लागेल. त्यांच्याकडे दीपक हुड्डा, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई आणि आवेश खान हे आयपीएल स्पर्धेतील महत्त्वाचे खेळाडू आहेत. केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक ही टीमची मोठी शक्ती आहे. मिडल ऑर्डरची काळजी लखनऊ टीमची मोठी काळजी मिडल ऑर्डरबाबत आहे. त्यांच्याकडं कृणाल पांड्या आहे. जो मागील सिझनपर्यंत मुंबई इंडियन्स या सर्वात यशस्वी आयपीएल टीमचा सदस्य होता. यंदा त्याच्यावर मिडल ऑर्डरची जबाबदारी आहे. पण पांड्याच्या अनियमित फॉर्मचा लखनऊला फटका बसू शकतो. IPL 2022 : लखनऊचे 2 खेळाडू टशन विसरणार का?, आजच्या मॅचकडे सर्वांचं लक्ष लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य टीम : केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, मनिष पांडे, दीपक हुड्डा, मनन व्होरा, कृणाल पांड्या, अंकित राजपूत, के. गौतम, रवी बिश्नोई, दुष्मंता चमिरा आणि आवेश खान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.