मुंबई, 28 मार्च : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडी टीम लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आज (सोमवार) पहिली मॅच खेळणार आहे. केएल राहुल (KL Rahul) कॅप्टन असलेल्या या टीमची पहिली लढत हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) टीमविरूद्ध होणार आहे. या मॅचमध्ये कुणाल पांड्या (Krunal Pandya) आणि दीपक हुड्डा (Deepak Hooda) या लखनऊच्या दोन खेळाडूंमध्ये कशी केमिस्ट्री असेल याकडे सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. काय घडलं होतं प्रकरण? मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy) बडोद्याच्या पहिल्या सामन्याआधी दीपक हुड्डाचं कर्णधार कृणाल पांड्यासोबत (Krunal Pandya) भांडण झालं. यानंतर दीपक हुड्डा बायो-बबल सोडून निघून गेला. वादानंतर दीपक हुड्डाने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहिलं आणि कर्णधार कृणाल पांड्यावर शिव्या दिल्याचे आणि करियर बरबाद केल्याचे आरोप केले. बडोदा क्रिकेट असोसिएशनने मात्र हुड्डाची ही वर्तणूक शिस्तभंग असल्याचं सांगत त्याचं संपूर्ण मोसमासाठी निलंबन केलं. बडोद्यानं निलंबन केल्यानंतर हुड्डानं राजस्थानकडून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याची वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजमध्ये निवड झाली होती. टीम इंडियाकडून समाधानकारक कामगिरी केलेल्या हुड्डाला लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) 5 कोटी 75 लाखांना खरेदी केले.कृणाल पांड्याला 8 कोटी 25 लाख रूपयांना खरेदी केले. त्यामुळे एकमेकांचा चेहराही न बघणारे हुड्डा आणि कृणाल आता एकाच आयपीएल टीममध्ये खेळणार आहेत. IPL 2022, GT vs LSG Team Prediction : ‘हे’ 11 खेळाडू करतील तुम्हाला मालामाल गंभीरची रोखठोक भूमिका लखनौ टीमचा मेंटॉर गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) या प्रकरणावर रोखठोक भूमिका घेतली होती. मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी घट्ट मैत्री असणे आवश्यक नाही. ते व्यावसायिक खेळाडू आहेत. त्यांना त्यांचं काम माहिती आहे. एका टीमकडून खेळायचं आहे याचा अर्थ रोज एकत्र डिनर करावा असा नाही. मी खेळत होतो त्यावेळी माझेही टीममध्ये सर्व मित्र नव्हते. त्याचा माझ्या कामगिरीवर काही परिणाम झाला नाही. ते परिपक्व आहेत. त्यांच्यावर मॅच जिंकण्याची जबाबदारी आहे, हे त्यांना माहिती आहे.’ असं मत गंभीरनं काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.