Home /News /sport /

IPL 2022 : हार्दिकबाबत पुन्हा उपस्थित झाला जुना प्रश्न, पांड्या देणार का उत्तर?

IPL 2022 : हार्दिकबाबत पुन्हा उपस्थित झाला जुना प्रश्न, पांड्या देणार का उत्तर?

गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलीय, पण त्यांचा कॅप्टन हार्दिक पांड्याबाबतचा (Hardik Pandya) जुना प्रश्न आजही कायम आहे.

    मुंबई, 11 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) एक नवं रूप पाहयला मिळालं आहे. गुजरात टायटन्सकडून पांड्यानं सातत्यानं तीन किंवा चार क्रमांकावर बॅटींग केली आहे. हार्दिकनं या सिझनमध्ये 11 इनिंगमध्ये 38.22 च्या सरासरीनं 344 रन केले आहेत. त्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. कॅप्टन म्हणूनही हार्दिक यशस्वी ठरलाय. गुजरात टायटन्सनं त्याच्या कॅप्टनसीमध्ये 'प्ले ऑफ' मध्ये धडक मारली आहे. या सर्वानंतरही हार्दिकच्या अडचणी संपलेल्या नाहीत. त्याच्याबद्दल जुना प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध मंगळवारी झालेली मॅच गुजरातसाठी महत्त्वाची होती. हार्दिकनं या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तो एक चांगली खेळी करेल अशी सर्वांची अपेक्षा होती. हार्दिक त्यामध्ये पुन्हा एकदा अपयशी ठरला. लखनऊ विरूद्ध हार्दिक फक्त 11 रन काढून आऊट झाला. आयपीएल 2022 ची सुरूवात दमदार बॅटींगनं करणारा हार्दिक मागील पाच सामन्यांमध्ये सपशेल अपयशी ठरला आहे. त्यानं मागील पाच सामन्यात 11, 23, 1, 3 आणि 10 रन केले आहेत. हार्दिक मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात निर्णायक क्षणी रन आऊट झाला होता. त्याची ही चूक टीमच्या पराभवाचं एक प्रमुख कारण ठरली. हार्दिक सध्या फिनिशर म्हणून नाही तर तीन किंवा चार नंबरवर बॅटींग करत आहे. त्या भूमिकेमध्ये त्यानं भरपूर रन करत टीमला आधार देणे आवश्यक आहे. पण, मागील पाच सामन्यात तो यामध्ये फेल ठरलाय. त्याच्या फिटनेसची शंकाही अजून दूर झालेली नाही. हार्दिकनं मागील पाच मॅचमध्ये फक्त एक ओव्हर टाकली आहे. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड करताना हार्दिकचा काय म्हणून विचार होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. IPL 2022 : शाहरूख खाननं केली संजय दत्तची नक्कल, VIDEO पाहून आवरणार नाही हसू ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात टी20 वर्ल्ड कप होत आहे. मागील वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक सपशेल अपयशी ठरला होता. त्यानंतर त्यानं टीम इंडियातील जागा गमावली. त्याला ऑल राऊंडर म्हणून खेळवायचं असेल तर त्यानं बॉलिंग करण्याचं सातत्य दाखवलं पाहिजे. तर फक्त बॅटर म्हणून खेळवायचं असेल तर भरपूर रन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हार्दिकची टीम इंडिया्त कोणत्या आधारावर निवड करायची हा प्रश्न कायम आहे. गुजरात टायटन्सच्या उर्वरित सामन्यांमध्ये त्याला या प्रश्नाचं खेळातून उत्तर द्यावं लागेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gujarat Titans, Hardik pandya, Ipl 2022, Team india

    पुढील बातम्या