मुंबई, 11 मे : पंजाब किंग्स (Punjab Kings) टीम ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करणार की नाही हे या त्यांच्या आगामी 3 मॅचनंतर स्पष्ट होईल. पंजाबनं आत्तापर्यंत 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत. चांगली सुरूवात करणारी पंजाबची टीम नंतरच्या टप्प्यातील साधारण कामगिरीमुळे सध्या पॉईंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. पंजाबची पुढील लढत आता शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) विरूद्ध होणार आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी पंजाबला हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे. पंजाबनं या ऑक्शनमध्ये शाहरूख खानला (Shahrukh Khan) मोठ्या अपेक्षेनं घेतलं होतं. स्पर्धेपूर्वी फॉर्मात असलेला शाहरूख आयपीएलमध्ये मात्र कमाल करू शकला नाही. तो गेल्या काही मॅचपासून टीमच्या बाहेर आहे. शाहरूखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यानं चित्रपट अभिनेता संजय दत्तची (Sanjay Dutt) नक्कल केली आहे.
जिममधील ट्रेड मिलवर शाहरूख संजय दत्तच्या स्टाईलनं चालत आहे. मुन्नाभाई एमबीबीएसमधील डॉयलॉगवर शाहरूखनं अभिनय केला असून पंजाब किंग्जनंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. फॅन्सनाही क्रिकेटर शाहरूखची ही फिल्मी स्टाईल चांगलीच आवडतीय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. IPL 2022 : अर्जुन तेंडुलकर बनला ‘मास्टर शेफ’, मुंबईच्या सहकाऱ्यांसाठी केलं कुकिंग! शाहरूख खानला पंजाब किंग्जनं 9 कोटींमध्ये खरेदी केले होते. तामिळनाडूच्या या क्रिकेटपटूनं 7 मॅचमध्ये 16.33 च्या सरासरीनं आणि 100 च्या स्ट्राईक रेटनं फक्त 98 रन केले. या दरम्यान त्याचा सर्वोच्च स्कोअर 26 होता. या खराब कामगिरीमुळे शाहरूखला टीममधून वगळण्यात आले आहे.