मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : लखनऊच्या लाजिरवाण्या पराभवानंतर गंभीर नाराज, खेळाडूंचा घेतला क्लास! पाहा VIDEO

IPL 2022 : लखनऊच्या लाजिरवाण्या पराभवानंतर गंभीर नाराज, खेळाडूंचा घेतला क्लास! पाहा VIDEO

लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर त्यांचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) चांगलाच नाराज झाला. त्यानं खेळाडूंची चांगलीच हजेरी घेतली.

लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर त्यांचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) चांगलाच नाराज झाला. त्यानं खेळाडूंची चांगलीच हजेरी घेतली.

लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर त्यांचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) चांगलाच नाराज झाला. त्यानं खेळाडूंची चांगलीच हजेरी घेतली.

मुंबई, 11 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये मंगळवारी टॉप 2 टीममध्ये सामना झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सनं लखनऊ सुपर जायंट्सचा (GT vs LSG) 62 रननं सहज पराभव केला. गुजरातनं या विजयानंतर 'प्ले ऑफ' मधील जागा नक्की केली आहे. लखनऊला अजूनही प्ले ऑफची संधी कायम आहे. लखनऊचे सध्या 16 पॉईंट्स असून टॉप 4 मधील जागा निश्चित करण्यासाठी त्यांना उर्वरित 2 पैकी एक सामना जिंकणे आवश्यक आहे.

लखनऊच्या या पराभवानंतर त्यांचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) चांगलाच नाराज झाला. त्यानं खेळाडूंची चांगलीच हजेरी घेतली. पराभूत होणं ही खराब गोष्ट नाही पण पराभव स्वीकारणं ही चुकीची गोष्ट आहे, असं गंभीरनं यावेळी सांगितलं. लखनऊ सुपर जायंट्सनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये गंभीर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी बोलताना दिसत आहे.

गंभीर यावेळी म्हणाला की, 'माझ्या मते आज आपण लढाई लढलीच नाही. आपण दुबळे वाटलो. प्रामाणिकपणे सांगायचं तर आयपीएल सारख्या स्पर्धेत कमकुवत राहण्याची कोणतीही संधी नाही. पराभूत होण्यात काहीच चूक नाही. एक टीम जिंकणार आणि एक हरणार. पण पराभव होणार हे समजणं अत्यंत चुकीचं आहे. या स्पर्धेत आपण अनेक टीमचा पराभव केला आहे. आपण चांगला खेळही केलाय.

त्यांनी चांगली बॉलिंग केली. आपल्याला तेच अपेक्षित होतं. ती जागतिक दर्जाची टीम आहे. त्यांच्याकडे वर्ल्ड क्लास बॉलर आहेत. तुम्ही इंटरनॅशनल बॉलर विरूद्ध खेळला आहात. या प्रकारच्या आव्हानांसाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे. त्यासाठी तर आपण सराव करतो.' असे गंभीरने सुनावले.

गुजरातने दिलेल्या 145 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊचा 13.5 ओव्हरमध्ये फक्त 82 रनवर ऑल आऊट झाला. राशिद खानने (Rashid Khan) 3.5 ओव्हरमध्ये 24 रन देत 4 विकेट घेतल्या. याशिवाय यश दयाळ आणि साई किशोर यांना 2-2 विकेट मिळाल्या. मोहम्मद शमीला एक विकेट घेण्यात यश आलं. लखनऊकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक 27 रन केल्या तर 11व्या क्रमांकावर खेळणाऱ्या आवेश खानने 12 रन केले.

IPL 2022 : हार्दिकबाबत पुन्हा उपस्थित झाला जुना प्रश्न, पांड्या देणार का उत्तर?

लखनऊविरुद्धच्या या विजयासोबतच गुजरात पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे, सोबतच प्ले-ऑफमध्ये पोहोचणारीही ही पहिलीच टीम ठरली आहे. गुजरातने 12 पैकी 9 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊने 12 पैकी 8 मॅच जिंकल्या आणि 4 सामन्यांमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं.

First published:

Tags: Gautam gambhir, Gujarat Titans, Ipl 2022, Lucknow Super Giants