Home /News /sport /

IPL 2022 : श्रेयसच्या टीममध्ये मिळणार मुंबईच्या दिग्गजाला संधी, पाहा KKR ची संभाव्य Playing11

IPL 2022 : श्रेयसच्या टीममध्ये मिळणार मुंबईच्या दिग्गजाला संधी, पाहा KKR ची संभाव्य Playing11

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा सुरू होण्यासाठी आता फक्त एक दिवसाचा कालावधी उरला आहे. या सिझनची सुरूवात चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) या मॅचनं होणार आहे.

    मुंबई, 25 मार्च : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा सुरू होण्यासाठी आता फक्त एक दिवसाचा कालावधी उरला आहे. या सिझनची सुरूवात चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) या मॅचनं होणार आहे. या दोन्ही टीमचे कॅप्टन आता बदलले आहेत. चेन्नईच्या कॅप्टनपदी रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) नियुक्ती झाली आहे. तर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा केकेआरचा कॅप्टन आहे. दिल्ली कॅपिटल्लची (Delhi Capitals) टीम घडवण्यात श्रेयसचा मोठा वाटा होता. दिल्लीच्या मॅनेजेंटनं ऋषभ पंतला (Rishbah Pant) कॅप्टन करण्याचं ठरवलं. त्यामुळे श्रेयस त्या टीममधून बाहेर पडला. त्यानंतर आयपीएल ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022) केकेआरनं श्रेयसला खरेदी केलं. आता केकेआरच्या श्रेयसकडून मोठ्या अपेक्षा आहेत. श्रेयससाठी खास बाब म्हणजे तो त्याचं होम ग्राऊंड असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर तो नव्या इनिंगची सुरूवात करत आहे. श्रेयससाठी ही सुरूवात सरळ नाही. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच केकेआरला धक्का बसला आहे. टीमचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि ओपनर एरॉन फिंच (Aaron Finch) सुरूवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाहीत. फिंच  पाकिस्तानमध्ये लिमिटेड ओव्हर्सची सीरिज खेळणार आहे. तर पॅट कमिन्स दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी 30 तारखेला मेलबर्नमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. त्यामुळे कमिन्स पहिल्या तीन मॅच खेळू शकणार नाही. रहाणेला संधी केकेआर शनिवारी होणाऱ्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) संधी देऊ शकते. टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या अजिंक्यसाठी ही आयपीएल स्पर्धा मोठी संधी आहे. तो व्यंकटेश अय्यरसह ओपनिंगला उतरेल. श्रेयस तीन नंबरवर तर नितिश राणा चार नंबरला बॅटींग करेल. तर विदेशी खेळाडूंमध्ये आंद्रे रसेल, सुनील नरीन, टीम साऊदी आणि सॅम बिलिंग्स यांचा Playing 11 मध्ये समावेश होऊ शकतो. IPL 2022 : कॅप्टन जडेजासाठी Good News, KKR ला हरवण्यासाठी प्रमुख खेळाडू फिट KKR ची संभाव्य 11 :  व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितिश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नरीन, टीम साऊदी, उमेश यादव, शिवम मावी आणि वरूण चक्रवर्ती
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Ipl 2022, KKR, Shreyas iyer

    पुढील बातम्या